पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्यावर कित्येक असे म्हणतील कीं, एलिझाबेथ राणीच्या वेळी जरी इंग्लंद अगदी लहान होतें, तरी तेव्हां इंग्लिशांचे चांगले चाललें होतें; तेव्हां पुन्हा कढ़ा- चित् तें तेवढेच झालें तरी त्यांचे चांगले कां चालणार • नाहीं? ह्यावर उत्तर इतकेंच आहे की, एलिझाबेथच्या काळी इंग्लिशांचें विशेष चांगल्या रीतीनें चाललें होतें, असं त्यांच्या पूर्वजांना वाटत नव्हतें, व म्हणून राष्ट्राचा विस्तार करण्यासाठी हरएक प्रकारची खटपट त्यांनी केली.... (शिवाय लहान लहान राष्ट्रांना लहान मुलांची उपमा देतात; आणि अशा रीतीने त्यांचा चांगलेपणा दर्शवितात. आतां लहान मुले लहान मुलांत आहेत तोपर्यंतच आनंदांत असतात; परंतु मोठ्या माणसांत जर ती मिसळली, तर त्यांना इजा पोहोचण्याचा फार संभव असतो. तेव्हां युनायतेद स्तेत्स हीं संस्थानें ज्याप्रमाणें परस्परांस चिकटून राहण्याचा प्रयत्न करितात, त्याप्रमागेच परस्.रांस चिकटून राहण्याचा प्रयत्न करणे ब्रिटिश वसाहतींना व मुलखांना हितावह आहे, हे उघड आहे. स्वतंत्र झाल्याने मोठमोठ्या राष्ट्रांकडून व्यापारा- संबंधाने किंवा राजकीय संबंधानें त्यांना फार त्रास पोहों- चणार आहे; म्हणून ह्याचा विचार ब्रिटिश राष्ट्रांतील प्रत्येक वसाहतीनें व देशानें करणें अवश्य आहे. परंतु कित्येक इंग्लिश लोक म्हणतील की, “ई- ग्लंदशी संबंध ठेवण्याची इच्छा वसाहतींनी करणे हे त्यांच्याच फायद्याचे आहे. पहा, आम्ही त्यांना