Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१६३) समूहाला कित्येक वर्षे पुरेल इतकी उत्तम जागा ब्रिटिश वसाहतीमुळे झाली आहे. तसेच हल्लींच्या वस्तुस्थितीकडे लक्ष दिलें असतां युनायतेद स्तेत्समध्ये न जातां ह्या लो- कांनी ब्रिटिश वसाहतींतच राहण्यास जावें; म्हणून त्या वसाहतींतील लोकांच्या मनांतील इंग्लिशांविषयींचें प्रेम त्यांनी कायम राखणे, ही गोष्ट ब्रिटिश व्यापारास अत्यन्त महत्त्वाची आहे. वसाहतीमुळे इंग्लिशांचे सामर्थ्य वाढते, म्हणजे त्यांना राजकीय महत्त्वहि प्राप्त होतें, हा त्यांचा शेवटचा म्हणजे ३रा उपयोग होय. लहान लहान राष्ट्र् मोड्न वसाहतींमुळे इंग्लि- त्यांची हळू हळू मोठाली राष्ट्र बनत शांचं स मर्थ्य वाढतें. चालली आहेत, असे इतिहासा वरून दिसून येतें;म्हणून युरोपांतील राष्ट्रांच्या योग्यतेची तुलना त्यांच्या फक्त युरोपांतील विस्तारावरून हल्ली कोणी करीत नाहीत, तर पृथ्वीवरील त्यांच्या विस्तारावरून करितात, असे पूर्वी लिहिलंच आहे. शिवाय, ब्रिटिश राष्ट्र, रशिया आणि युनातेद् स्वेत्स ह्यांसारखी विस्तृत राष्ट्रच पुढील काळी महत्त्वाचीं बनतील असेही उघड आहे. तसेच ह्या मोठाल्या राष्ट्रापैकी रशिया व युनायूतेद स्त्स ह्यांसारख्या राष्ट्रांचा कल व्यापाराचं संगोपन करण्याकडे दिसत असल्यामुळे लहान लहान राष्ट्रांची स्थिति हळू हळू अधिकाधिक भयंकर होत जाईल; कारण ती राष्ट्र आणि त्यांचा व्यापार त्यांच्या फार बलाढ्य अशा ह्या शेजान्यांवर अवलंबून राहणार आहे.