पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५७). मोडून टाकण्यास फार प्रयास पडले; तसेच ते आतां पुन्हा सुरू करूं म्हटले तर त्याहूनहि अधिक प्रयास पडतील. म्हणून असे म्हणण्यास हरकत नाहीं की, ज्या राष्ट्रांत व्यापाराचें संगोपन करण्याची पद्धति सुरू आहे, त्यांत ती पद्धति बंद होऊन अप्रतिबंध व्यापार सुरू होण्याचा ज्याप्रमाणे संभव कमी आहे, त्याप्रमाणेच ज्या राष्ट्रांत ल्ली अप्रतिबंध व्यापार सुरू आहे, तेथें तो बंद होऊन व्यापाराचे संगोपन होण्याच्या भीतीचाहि संभव कमीच आहे. i मनोवृत्तींचा व्यापारावर जो परिणाम होतो, त्या विषयीं विचार करितांना ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे की, "ज्याच्याकडे राज्यसत्ता जाते त्याच्याकडेच व्यापारहि जातो, " ( Trade follows the flag ) येऊं दिल्यास देशांतील शेतकऱ्यांचे नुकसान होईल. हे नुकसान न व्हावें, म्हणून बाहेरून येणाऱ्या धान्यावर कर बसविण्यासाठी कायदे केलेले होते; त्यांना 'कॉर्न्-लॉज्' म्हणत. अशा रीतीने व्यापा- रास प्रतिबंध करण्यांत राष्ट्र चे खरे हित नाही, अशी रिचर्ड काव्- डन ह्याची व जान ब्राइट प्रभृति त्याच्या मित्रांची खातरी झाली. तेव्हां काव्डन ह्यानें कॉर्न्-लॉज् रद्द करण्याच्या उद्देशाने १८३८ त ‘ऍन्टी–कॉर्न-लॉ-लीग’(धान्याच्या कायद्यांविरुद्ध मंडळी ) नांवाची संस्था स्थापिली. आपला उद्देश सिद्धीस नेण्यास त्याला फार प्रयास पडले; परंतु १८४६ त त्याला यश येऊन हे कायदे रद्द झाले; व बाह्य देशांहून येणाऱ्या धान्यावरील कर बंद झाले. त्याच्या श्रमाबद्दल त्याला त्याच्या देशबांधवांनी ७० हजार पौंड बक्षीस, दिले. हा १८०४त जन्मला, व १८६५त मत्यु पावला. हा मांचेस्तर येथील कापसाच्या कारखान्यांत भागीदार होता. ८१४