पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५३) तला; ११ १८१३ त ४, २०,००,००० पौंडांचा ब्रिटिश माल घे- म्हणजे १४ वर्षांत हा माल तेथें १० शांनी जास्त खपूं लागला; तात्पर्य, जवळ जवळ दुप्पट माल खपूं लागला, असे म्हणण्यास हरकत नाहीं. तेव्हां ह्याच प्रमाणानें हा खप वाढत गेल्यास आणखी २१ वर्षांनी वरील ५ राष्ट्र ९,८०,००,००० पौंडांचा माल घेऊं लागतील; परंतु ह्या चार वसाहती ९,९०,००,००० पौंडांचा माल घेऊं लागतील ! ! तसेंच, इतर राष्ट्रां- तील जो एकंदर माल त्या वसाहती घेतात त्याच्या वाढी- च्या प्रमाणाशी ब्रिटिश मालाच्या वाढीचें प्रमाण ताडून पाहिले असतां अधिक किंवा कमी भरतें असा दुसरा एक प्रश्न उत्पन्न होतो. ह्या संबंधानें थोडा बहुत विचार केला असतां असें दिसून येईल की, ब्रिटिश मालाच्या वाढीचें प्रमाण पूर्वीप्रमाणेच कायम आहे; इत- केंच नाहीं, तर इतर राष्ट्रांतील मालाच्या वाढीच्या ग्रमाणापेक्षां कदाचित् थोडस वाढलेंहि आहे. म्हणून वसाहतींना परदेशच्या मालापेक्षां ब्रिटिश माल हल्लीं किंचित् अधिक आवडूं लागला आहे, असें ठरतें. आतां ह्या विषयाचा दुसऱ्या एका दृष्टीने विचार करूं. पुढे जे आंकडे दिले आहेत ते मारशाल आणि कंपनीमधील मि. जान मारशाल-लीड्स येथील चेंबर आफू कामर्सचे ( व्यापायांच्या सभेचे ) अध्यक्ष - ह्यांज- मिळाले आहेत. त्रिटिश पदार्थाचा वसाहतींत जो रूप होतो त्याचें महत्त्व.