पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११८) ज्यांना म्हणतात त्यांमध्ये एका बाजूला फार मोठ्या ठश्यांनीं काळ्या शाईनें राष्ट्राचे कर्ज दाखविलेले असते; व दुसऱ्या बाजूस अति लहान ठश्यांनी तांबड्या शाईनें राष्ट्राचें वैभव दाखविलेले असते ( सारांश, कर्जाचा मोठा वाऊ करून दाखविलेला असतो, व त्या कर्जामुळे जो अति मोठा फायदा होत असतो तो कांहींच नाही, असे दाख- विण्याचा प्रयत्न असतो. ) इंग्लिशांच्या पूर्वजांनी युद्धे वगैरे करण्यांत जे द्रव्य खर्चिले त्याचा वर लिहिल्याम- माणे त्यांचेच वंशज सांप्रत त्यांच्या वतीनें जमाखर्च दाखवितात. आपल्या पूर्वजांनीं लढाया करून इतकें वैभव आपणांसाठी संपादून ठेविलें, ह्याबद्दल हल्लीं इंग्लि- शांनी वास्तविक त्यांचा गौरव केला पाहिजे; परंतु असे न करितां उलट हे वैभव संपादण्यासाठी त्यांनी केलेल्या खर्चाचा ते मोठा बाऊ करून दाखवितात, हे योग्य नाहीं. राष्ट्राचे कर्ज ही वसाहती मिळविण्यास पडलेली किंमत होय. समजा, एक भांडवलवाला एका खाणीचें काम चाल- वीत आहे; ह्या कामांत प्रतिवर्षी तो पुष्कळ पैसा घालीत आहे; वारंवार पैसा कर्जी काढूनहि तो त्या धंद्यांत घा- लीत आहे; ती खाण फार भयंकर प्रकारची असल्या- मुळे मोठाले अपघात होण्याची तेथें फार भीति आहे; तसेंच वारंवार ह्याप्रमाणें भयंकर अपघात घडलेलेहि आ हेत. अशी एकंदर स्थिति असतांहि कोणी येऊन सांगितले की, ह्या एकंदर धंद्यापासून त्या भांडवलवाल्याला