Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११७) नवी प्राण्यांच्या ज्या स्वाभाविक मनोवृत्ति आहेत, त्यां तलिच स्वसंरक्षण ही एक अत्यन्त प्रबल मनोवृत्ति आहे; व हिच्यामुळेच इंग्लिशांस वरील युद्धे करणे भाग झालें होतें. ह्या युद्धांची मुख्य कारणे पुढे लिहिल्याप्रमाणें आहेत : - [ १] फ्रेंच लोक आपल्या वसाहती आपणां- पासून जिंकून घेतील, व त्यामुळे आपला तेथील व्यापार बुडेल, अशी इंग्लिश लोकांस असलेली भीति: आणि [२] फ्रेंचांशी लढाई करून त्यांच्या वसाहती घेतल्यानें आप लीं व्यापाराची ठिकाणें वाढवितां येतील, असा जो संभव त्यांना दिसत होता, तो संभव. तेव्हां ह्या युद्धांच्या जमा- खर्चाची कल्पना करणे असल्यास ( त्यांपासन इंग्लिशांचें हिताहित काय झालें तें पाहणें असल्यास) दोन प्रश्नांचा विचार केला पाहिजे. [ १ ] इंग्लिशांच्या वसाहतीं त्यांच्या हातून जाण्याची भीति खरोखरच होती किंवा काय? व [२] फ्रेंचांच्या वसाहती जिंकण्यास त्यांना जो खर्च आला त्याचा पूर्ण मोबदला त्यांना मिळाला की काय? जर मोबदला मिळाला असेल तर तो जमेच्या सदरास धरिला पाहिजे. तसेंच युद्धांकरितां व देशाच्या कर्जाच्या फेडीकरितां दिलेल्या रकमा खर्चाच्या सदरास घरिल्या पाहिजेत. आतां इंग्लिश लोक हा जमाखर्च अशा रीतीनें ताडून पाहत नाहींत. राष्ट्राच्या जमाखर्चाचे खर्डे