Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७६)

कींच, हिंदुस्थानांतून येणाऱ्या मालाच्या मागण्या, एक कारण आहे असे म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं.

इंग्लंदांतून हिंदुस्थानांत येणाऱ्या मालाची ही येथून इंग्लंदांत जाणारे मुख्य जिन्नस. हकीगत झाली. आतां येथून जे जिन्नस त्या देशांत जातात, त्यांविषयीं विचार करूं. ह्या जिनसांपैकीं अति महत्त्वाचे जिन्नस कापूस व धान्य होत. दहा वर्षांपूर्वी ह्या देशांतून त्या देशांत प्रतिवर्षी सुमारें १०,००,००० हंड्रेडवेट गहूं जात असत; परंतु ही संख्या इतकी झपाट्याने वाढत आहे की, गेल्या वर्षी १,००,००,००० हंड्रेडवेट गहूं गेले. गव्हांच्या व्यापा- राची वृद्धि पुढील गोष्टींवर अवलंबून असते, हे लक्षांत ठेवण्यासारखें आहे. ( १.) ह्या देशांत पिकाची सुबत्ता; ( २ ) युनायूतेद स्तेत्स व युरोप ह्यांत नेहमींपेक्षां धान्य कमी उप्तन्न होणें ; ( ३ ) बारदान वाहण्याच्या नोराचा दर कमी असणें; व ( ४ ) वटावाचा भाव कमी असणे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पालेमेंटाच्या ब्ल्यू बुकांत ( पार्लमेंटाच्या माहितीकरितां प्रसिद्ध केलेल्या सर- कारी रिपोटर्यंत ) असे लिहिले आहे कीं, "ज्या वेळी ह्या ४हि गोष्टी अनुकूळ असतील, त्या वेळी इंग्लंदांतील बाजारच्या पेठांतून हिंदुस्थानच्या गव्हांचा इतका कांहीं विलक्षण खप होईल की, तो खप पाहून हिंदुस्थानांत गहूं, किती उत्पन्न करितां येईल ह्याविषयीं ज्यांना पूर्ण ज्ञान नाहीं, त्यांना फारच आश्चर्य वाटेल; व ह्याप्रमाणें मागें