पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६५ )

 ही स्थानिकस्वराज्याची स्थिति झाली. देशांतल्या देशांत स्वस्थता राखण्याचें काम हिंदुस्थानांत फार सुलभ आहे. हिंदुस्थानांत दर १२०० मनुष्यांस १ ह्या प्रमाणानें पोलिसची संख्या आहे; परंतु इंग्लिश लोक कायदेशीर रीतीनें अधिक भांडणारे असल्यामुळे इंग्लंदांत दर ६३६ मनुष्यांस १ ह्या प्रमाणानें पोलीस लागतात. न्यायाची सत्ता व अंमल बजाविण्याची सत्ता ह्या निरनिराळ्या अधिका-यांकडे आहेत. तसेंच दिवाणी व फौजदारी खटल्यांच्या चौकशीकरितां इंग्लंदांतल्याप्रमाणेंच हिंदुस्थानांतहि कोर्टांची मालिका आहेच. कलकत्ता, मद्रास, मुंबई व अलाहाबाद येथें हायकोर्टे आहेत. हायकोर्टांच्या जज्यांपैकीं बहुतेक इंग्लिश असून थोडे नेटिव्ह असतात.येथें चालणारे दिवाणी कायदे कांहीं अंशीं देशाच्या चालीरितींस धरून व कांहीं अंशी इंग्लिश कायद्यांस धरून ठरविलेले आहेत. तसेंच लार्द मेकाले ह्या विख्यात बुद्धिमान् पुरुषानें केलेल्या नियमांच्या आधारानें फौजदारी कायदे ठराविलेले आहेत. देशाच्या संर
ह्या देशांतील  क्षणास जें सैन्य आहे त्यांत इंग्लिश सुमारें
 सैन्य. *६०,०००आहेत;व नेटिव्ह त्यांच्या दुप-

टीहून म्हणजे १,२०,०००हून कांहीं अधिक आहेत.


 * १८८७ मध्यें हे आंकडे पुढें लिहिल्याप्रमाणें हॊतेः--
युरोपियन ६९,७६४; नेटिव्ह १,४१,०००; मिळून एकंदर सैन्य २,१०,७६४