Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५२ )

आणिलें त्या मोगल घराण्यांतील शेवटच्या बादशहांच्या ह्वातीं राज्यसत्ता कांहींच राहिली नव्हती; तथापि त्यांचें पूर्वीचें वैभव अगदींच नष्ट झाले नव्हतें; व ते नामधारी बादशाह होतेच. परंतु ह्या बंडामुळे मोगल घराणे अग- दींच लयास गेलें; व कांहीं वर्षेपर्यंत हिंदुस्थानांत नामधा- रीहि सार्वभौम राजा नव्हता. परंतु इ. स. १८७७त ही स्थिति बदलली. ह्या वर्षी राणीनें “हिंदुस्थानची बाद- नाहिण” ( एंप्रेस ऑफ इंडिया ) अशी पदवी धारण केली; आणि दिल्लीच्या बादशहांच्या दुर्बलतेमुळे जी सत्ता त्यांच्या हातून गेली, ती इंग्लिशांनी मिळविली असून मी इंग्लिशांची राणी असल्यामुळे ह्यापुढे त्यांच्या वतीनें ती सत्ता मीं आपल्या हाती घेतली आहे, व माझ्या २५ कोटि प्रजेवर ह्यापुढें न्यायानें व दृढनिश्चयानें राज्य कर- ण्याचा ठराव केला आहे, अशा अर्थाचे जाहीरनामे देशांत सर्वत्र लागले.

 कंपनीच्या एकंदर इतिहासांत पुढील सन विशेष लक्षांत ठेवण्यासारखे आहेतः- १७४८; १७७३;१७९३; १८१३; १८३३ व १८५३. कंपनीच्या राज्यसत्तेस १७४८त आरंभ झाला; १७७३त रेग्युलेतिंग आक्ट पास होऊन सांप्रतचें “ ब्रिटिश हिंदुस्थान " बनण्यास प्रारंभ झाला, व कंपनीच्या अधिकाराची मुदत २०।२० वर्षांची ठरली; व १८१३, १८३३ आणि १८५३ ह्या वर्षी तिच्या सनदांत कांहीं फेरफार होत