पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) प्रस्तवन. इंग्लंदांतील लीड्स नांवाच्या शहरांतील यार्कशायर कॉलेजांतील प्रोफेसर रानसम, एम्. ए., ह्यांनीं त्या शहरांतील मजुरांच्या माहितीसाठीं *ब्रिटिश वसाहती आणि हिंदुस्थान' ह्याविषयावर कांहीं व्याख्यानें दिलीं. हीं व्याख्यानें मजुरांसाठीं असल्यामुळे त्यांतील माहिती ठोकळ असणें साहनिकच होतें. शिवाय ती माहिती त्यांनीं फार सुलभ रीतीनें सांगितली होती. इंग्लंदांतील मजुरांसाठीं दिलेली ही माहिती आपल्या देशांतील पुष्कळांस व विशेषेकरून निवळ मराठी जाणणारांस उपयुक्त व वाचण्यासारखी वाटेल, असें समजून हा प्रयत्न केला आहे. इंग्लंदांत तर ह्या पुस्तकाच्या फार थोड्या अवकाशांत तीन आवृत्ति निघाल्या; ह्यावरून त्या देशांतील लोकांस हा विषय किती पसंत पडला असावा, हें सहज समजेल. शिवाय थोड्याच दिवसांपूर्वी परलोकवासी झालेले प्रसिद्ध प्रोफेसर सोली ह्यांनींहि ह्या पुस्तकाबद्दल आपली संमतेि व्यक्त केली होती. प्रोफेसर रानसम ह्यांनीं आपल्या पुस्तकाची भाषा व्याख्यानपद्धतीचाच ठेविली आहे; परंतु भाषांतरांत तशी भाषा ठेवणें इष्ट न वाटल्यामुळे बरेच ठिकाणीं भाषेस जुळण्यासारखे फेरफार केले आहेत; व मूळ