पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४२)

बेधडक नंबर २च्या घरांत शिरलां असतां, आग विझ- विणारांना मदत करून आग वाढविणारांचा पाडाव केला असता, व आग लावणारांस पुन्हा वर डोकें काढितां येऊं नये, अशाविषयीं योग्य खबरदारी घेतली असती; आणि अर्से करणेंच सयुक्तिक झालें असतें.

 आतां ईस्त इंदिया कंपनीनें जें केलें तें हेंच. हिंदु- स्थानांतील नेटिव्ह संस्थानांचा राज्यकारभार इतका वाईट होता की, त्यांत बहुतेक ठिकाणीं अंदाधुंदीच होती. ज्यांत अंदाधुंदी नाहीं, अशीं अपवादक संस्थानें थोडींच. ह्या अंदाधुंदीमुळे कंपनीचा व्यापार सुरळीत चालत नसे; व स्वतःच्या मुलखाबाहेर कंपनीस कांहींच करितां येत नसे. एवढेच होऊन राहिलें नाहीं; कारण इंग्लिशांस अद्यापि फ्रेंचांची भीति होतीच. प्रत्येक नेटिव्ह संस्था - निकाच्या दरबारी फ्रेंच हेर असत, व ते त्यांना इंग्लिशां- विरुद्ध उठण्याविषयीं भर देत असत. शिवाय युरोपां- तील किंवा इतर ठिकाणच्या इंग्लिशांच्या वसाहतींवर हल्ला करणें जसें शक्य आहे, तसेंच त्यांच्या हिंदुस्था- नांतील मुलखावरहि हल्ला करणें शक्य आहे, असें नेपो- लियन ह्यासहि वाटत होतें. म्हणून वारंवार असें घडे कीं, एका प्रांतांत कंपनीनें स्वस्थता केली नाहीं तोंच दुसऱ्या प्रांतांत हात घालणें तिला भाग पडे. कारण आपल्या शेजारच्या प्रांतांत अव्यवस्था उप्तन्न झाल्यास तिचा संसर्ग आपल्या मुलखास होईल की काय, अशी कंपनीला