पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४१ )

र्निर जनरल हिंदुस्थानांत नेमून पाठविते वेळीं कंपनीचे दायूक्तर (व्यवस्थापक) ह्यांचाहि त्याला सक्तीचा हुकूम असे कीं, त्यानें मागील गव्हर्नर जनरलांप्रमाणे लढायांत बिलकूल पडूं नये. तसेंच तो गव्हर्नर जनरल इंग्लंदांतून निघते वेळीं ह्याप्रमाणे शांतता राखण्याचें अभि वचनाह देई; परंतु हिंदुस्थानांत आल्यावर थोड्याच दिवसांनी त्याला लढायांत पडावें लागे.

असे कां होई, हें स्पष्ट होण्यासाठी एक सोपें कल्पना करा की, १० घरांची एक

कंपनीच्या लढा-
आळी आहे, व त्या आळींतील नंबर १च्या
यांची कारणें.


व घरांत तुम्ही राहत आहां; नंबर ९च्या

किंवा १० च्या घरास आग लागली; तुमच्या घराच्या बाजूला वारा वाहूं लागला नाहीं, तोपर्यंत तुम्हांला त्याजबद्दल फारशी काळजी बाळगावयास नको. परंतु कल्पना करा कीं, नंबर २च्याच घरास आम लागली आहे; तसेंच त्या घरांतील निमे लोक ज्वाला प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करीत असून निमे त्या विझ- वून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेंहि तुम्हांला कळून आलें. ज्वाला तुमच्या घरापर्यंत खास पसरतील असे उघड दिसत आहे; आणि कसें होईल, काय होईल, ह्या भीतीमुळे तुम्हांला व तुमच्या कुटुंबांतील माणसांना नेहमींचा कामधंदा सुचत नाहींसा झाला आहे. अशा स्थितींत तुम्ही काय कराल? उघडच आहे कीं, तुम्ही उदाहरण घऊं.