पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६८)


ण्यास हरकत नाहीं. वसाहतींपासून त्यांना मार्गे फायदा झालेला आहे, हल्ली होत आहे, आणि पुढे ह्याहूनह अधिक होण्याचा संभव आहे. तर मग ज्या मित्रापासून ह्याचप्रमाणे तिन्ही काळ फायदा होतो, अशा मित्राला ज्या रीतीनें वागविर्णे योग्य होईल, त्याच रीतीनें ह्या वसाहतींनाहि इंग्लिशांनी वागविले पाहिजे; ज्या गोष्टी केल्या असतां त्यांची मनें क्षुब्ध होतील त्यांचा अत्यन्त तिरस्कार केला पाहिजे; वसाहतींचें जें कल्याण तेंच आपलेंहि कल्याण, अर्से त्यांनी स्पष्टपणे समजले पाहिजे; आपल्याबद्दल पूज्यबुद्धि वसाहतींनी प्रदर्शित केली असतां त्याजबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे; इंग्लिशांस मदत करण्याची इच्छा त्यांनी दर्शविली असतां त्या प्रसंगीं त्या मदतीची जरी विशेष आवश्यकता नसली तरी पुढील काळावर नजर देऊन त्यांच्या मदतीबद्दल आपली संमति इंग्लिशांनीं त्यांना प्रदर्शित करण्याची, सावधगिरी ठेविली पाहिजे; आणि इतक्या सर्व गोष्टी जोपर्यंत इंग्लिश लोक करीत आहेत, तोपर्यंत इंग्लिशांपा- सून स्वतंत्र होण्यासाठीं वसाहती आपण होऊनच प्रयत्न करावयास लागतील, अशी भीति बाळगण्याचें त्यांना कांहींच कारण नाहीं.

समाप्त.