पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६५)

व्यापारासंबंधानें स्वातंत्र्य दिले आहे; आरमार ठेवून आम्ही त्यांचे संरक्षण करितों; त्यांच्या हितासाठीं आम्ही युद्धे करितों; आणि इतकेंहि असून त्यांच्यापा- सून आम्हांस प्रत्यक्ष फायदा कोणताहि नाहीं. इतकेंच नव्हे, तर त्यांच्यामुळे आम्हांस वारंवार अडचणी येतात; व केव्हां केव्हां युद्धप्रसंगहि येतात. इतर राष्ट्रांना देखील त्यांच्या वसाहतीपासून व्यापारासंबंधानें इंग्लंदाम- मार्णेच मोठाले फायदे झालेले आहेत. असे असतांहि त्या वसाहतींच्या संरक्षणाकरितां इंग्लंदापेक्षा त्यांनी कभी खर्च केला आहे; इतकेंच नव्हे तर, त्या वसाहतींपासून मनुष्यांची व पैशांची मदतहि त्या राष्ट्रांनी मिळविलेली आहे. तेव्हां आमच्या वसाहतींकरितां जर आम्ही इतकें करीत आहों, तर त्या होऊनच आम्हांस धरून कां राहणार नाहीत ?

थोड्या वर्षांपर्यंत अशी स्थिति पुष्कळ अंशानें होती खरी. सर्व ब्रिटिश राष्ट्राचें संरक्षण करण्याचें ओझे इंग्लंदावरच होतें. प्रसंग येईल तेव्हां लढावें, नाहीं तर वसाहतींपासून त्यांना लष्करी मदत होते, आपापला धंदा करावा, अशा प्रका- रची वसाहतींची पुष्कळ फौज असे व त्यांच्या किनाऱ्यांच्या संरक्षणापु- रथोत्यांचें आरमारहि असे. ह्याशिवाय प्रत्यक्ष इंग्लंदास म्हणून त्यांची मदत मुळींच नसे. परंतु आतां हा सर्व प्रकार बदलला आहे. ह्या वसाहतींची मदत इंग्लिशांनी मागितली नसतांहि त्यांनी विलक्षण उदार