पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३६)


३.दक्षिण आफ्रिकेतील वसाहती; ह्यांत केप ऑफ् गुड होप ही अति महत्त्वाची होय.
४. आस्खेलियांतील वसाहती; व न्यू झीलंद.


 व्यापाराच्या कामीं उपयोगी पडण्यासाठीं स्था- पिलेल्या वसाहती२व्या वर्गात येतात. ह्या पृथ्वीवर सर्वत्र पसरल्या आहेत; व ह्यांतील बहुतेक ठिकाणची हवा फार रोगट आहे. ह्या वसाहतींतून व्यापारी लोक व्यापारधंद्यासंबंधानें कांहीं काळ राहतात. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील लेगास व चीनच्या किनाऱ्यावरील हांगकांग ह्या वसाहती अशा प्रकारच्या आहेत.

 वाढणाऱ्या लोकसमूहाला वस्ती करण्याकडेहि ज्यांचा उपयोग होत नाहीं, व व्यापारधंद्यासंबंधानेंहि वस्ती करण्याकडे ज्यांचा उपयोग होत नाहीं, अशा प्रका- रच्या इंग्लिशांच्या कित्येक वसाहती आहेत; व त्यांचा समावेश ३ या वर्गांत होतो. एखादें अफाट सैन्य असावें, व त्याच्या टोळ्या एकमेकींपासून अनेक मैलांच्या अंतरानें ठेविलेल्या असाव्या; तशासारखी त्यांच्या वसाहतींची स्थिति आहे. इंग्लंदाशी त्यांचें दळणवळण चालू राखण्यासाठी मधून मधून पुष्कळ ठिकाणे त्यांना आपल्या ताब्यांत ठेवावी लागली आहेत. शिवाय शत्रूंचा पाठलाग चुकवून जाण्यासाठी, वादळानें गलव- तांची मोडतोड झाल्यास त्यांची दुरुस्ती करण्यासाठी, किंवा कोळशांचा साठा संपला असल्यास पुन्हा नवीन