पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३५)
प्रकरण चौथे.

ब्रिटिश वसाहतींची सांप्रतची स्थिति व त्या त्यांनी

आपल्या ताब्यांत कां ठेविल्या पाहिजेत.


 ब्रिटिश वसाहतींच्या योग्यतेचें वास्तविक महत्त्व ध्यानांत आणण्यास पहिला मार्ग म्हटला म्हणजे, त्या ब्रिटिश लोकांच्या सर्व एकत्र धरून त्यांच्या विस्तारावि- हल्लींच्या वसाहती. षयीं कांहीं कल्पना मनांत आणण्याचा प्रयत्न करणें. हा विस्तार ध्यानांत आणण्यास पुस्तकाच्या प्रारंभी दिलेल्या नकाशाचा बराच उपयोग होईल. दुसरा मार्ग असा कीं, खुद्द ब्रिटिश बेटांशीं वसाहतींचे जे निरनिराळे संबंध आहेत, त्यांच्या अनुरोधानें. त्यांचे वर्ग करणे. हिंदुस्थानाशिवाय इंग्रजांच्या ताब्यांतल्या हडींच्या वसाहतींचे ३वर्ग करितां येतील.

 ज्या वसाहतींत त्यांच्या वाढत चाललेल्या लोक- समूहाला जाऊन वस्ती करणें इष्ट आहे, अशा प्रका- रच्या वसाहती १ ल्या वर्गात येतात. त्यापुढें लिहि- ल्याप्रमाणे आहेत:-

१. उत्तर अमोरिकेतील वसाहती; ह्यांत कानडा मुख्य होय.
२.वेस्ट इंडीज बेटांतील वसाहती; ह्यांत जमेका ही महत्त्वाची होय.