राष्ट्राचे कर्ज ही वसाइती ज्यांना म्हणतात त्यामध्ये एका
मिळविण्यास पडलेली
किंमत होय.
बाजूज़ फार मोठ्या ठश्यांनी
गळ्या शाईनें राष्ट्रांचे कर्ज दाखविलेले असते; व दुसऱ्या
बाजूस अति लहान ठश्यांनी तांबड्या शाईनं राष्ट्राचें
वैभव दाखविलेले असत ( सारांश, कर्जाचा मोठा बाऊ
करून दाखविलेला असतो, व त्या कर्जामुळे जो अति
मोठा फायदा होत असतो तो कांहींच नाहीं, असे दाख-
विण्याचा प्रयत्न असतो. ) इंग्लिशांच्या पूर्वजांनी युद्धे
वगैरे करण्यांत जे द्रव्य खर्चिलें त्याचा वर लिहिल्याप्र-
माणे त्यांचेच वंशज सांप्रत त्यांच्या वतीनें जमाखर्च
दाखवितात. आपल्या पूर्वजांनी लढाया करून इतकें
वैभव आपणांसाठीं संपादून ठेविलें, ह्याचद्दल हल्ली इंग्लि-
शांनीं वास्तविक त्यांचा गौरव केला पाहिजे; परंतु असे
न करितां उलट हे वैभव संपादण्यासाठी त्यांनी केलेल्या
खर्चाचा ते मोठा बाऊ करून दाखवितात, हे योग्य नाहीं.
समजा, एक भांडवलवाला एका खाणीचे काम चाल-
वीत आहे; ह्या कामांत प्रतिवर्षी तो पुष्कळ पैसा घालीत
आहे; वारंवार पैसा कर्जी काढूनहि तो त्या धंद्यांत घा-
लीत आहे; ती खाण फार भयंकर प्रकारची असल्या-
मुळे मोठाले अपघात होण्याची तेथे फार भीति आहे;
तसेच वारंवार ह्याप्रमाणे भयंकर अपघात घडलेलेहि आ-
हेत. अशी एवंदर स्थिति असतांहि कोणीं येऊन
सांगितले की, ह्या एकंदर धंद्यापासून त्या भांडवलवाल्याला