पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०८)

परंतु तिच्यावरील गव्हर्नराची नेमणूक इंग्लंदाहून होत असे; व त्या वसाहतींना इंग्लंदाशी व्यापार करण्याची मात्र मोकळीक असे. उत्तर अमेरिकेतील इंग्लिशांच्या वसाहतींच्या आरंभाचा इतिहास ह्याप्रमाणें झाला.

 ह्यावरून अर्से दिसून येईल कीं, क्रामवेल ह्याची सत्ता इंग्लंदांत होती त्यावेळी म्हणजे १७व्या शत- काच्या मध्याच्या सुमारास, अमेरिका खंड स्पेन, पोर्तु- गाल, फ्रान्स, हार्लंड व इंग्लंद इतक्या युरोपांतील राष्ट्रांच्या ताब्यांत होतें. ह्यांपैकीं स्पेन व पोर्तुगाल ह्यांचे भाग मोठाले होते. उत्तर अमेरिकेंत फ्रान्सच्या लढाई करून मिळविलेल्या वसाहती. ताब्यांत बराच मुलूख होता; व वरील दोन राष्ट्रांच्या खालोखाल फ्रान्साचेंच वर्चस्व तेथे होतें. हालंद व इंग्लंद ह्यांच्या ताब्यांत त्या काळी सर्वांत कमी प्रदेश होता. आतां तेव्हां अमेरिका खंडांत हालंदच्या ताब्यांत फारच कमी मुलूख होता हें खरें; परंतु एशिया खंडाच्या आग्नेय किनाऱ्यापासून बण्याच अंतरावरील मसाल्यांच्या बेटांत व जावा बेटांत त्यांच्या पुष्कळच वसाहती होत्या. बर्म्यूदा बेटांतील व उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्यावरील इतर लहानसान वसाहती इतक्याच काय त्या इंग्लंदच्या ताब्यांत होत्या.अमे- रिकेंतील मूळच्या रहिवाशांच्या ताब्यांतील प्रांत जिंक ण्यांतच हा वेळपर्यंत वरील युरोप खंडांतील राष्ट्रांची च ढाओढ सुरू होती. परंतु आलिव्हर कामवेल ह्याने