७७ हिंदु राष्ट्रवाद संस्कृति ह्या बंधांनी हिंदूसमाजास नुसते एकरूपी बनविलें नाहीं तर, इतरांपासून आपण भिन्न आहोत, याचाही जाणीव करून दिली. उपरोक्त बंधांमुळे हिंदु हेच हिंदुस्थानांत राष्ट्र आहेत, हे सावरकर बंधु आणि गोळवलकर यांच्या ग्रंथांवरून दिसतेच. परंतु एकत्वाची जाणीव आणि एकत्र राहाण्याची इच्छा हेच राष्ट्रीयत्वाचे एकमेव गमक मानावयाचे म्हटले तरी, त्याप्रकारची एकत्वाची जाणीव हिंदु समाजांत शतकानुशतके । नांदत होती है आतापर्यंत दिलेल्या अनेक उतान्यांवरून स्पष्ट होते. (२) हिंदु समाजांत एकत्व निर्माण करणारी कारणे. | परंतु अशाप्रकारची ही एकत्व-भावना सहजासहजी निर्माण झालेली नाहीं. एकत्वभावनेची ही तेजस्वी ज्योत सतत तेवत राहावी यासाठी आपल्या पूर्वजांनी अनेक युक्त्या योजिल्या होत्या. या युक्त्या अथवा योजना हजारों वर्षांच्या देवघेवींत निर्मिल्या गेल्या. ज्ञानकोशकर्ते डॉ. केतकर' म्हणतात, ‘ भारतीय संस्कृति एकाच मानव वंशांतुन निघालेली नाही; तर वैदिक परंपरेच्या लोकांच्या आचारांशी आणि धर्माशी इतरांच्या आचारधर्मांचे एकीकरण होऊन आजचे ‘हिंदुत्व’ निर्माण झाले आहे.' । भारतीय समाजांत एकत्व नांदावें, तसेच समान संस्कृतीची जाणीव सतत जिवंत राहावी यासाठी चार धामांच्या यात्रेची कल्पना श्रीमच्छंकराचायांनी हिंदु समाजांत रूढ केली. याविषयी पंडित सातवळेकर म्हणतात-4 श्रीमत् शंकराचार्य पंचायतन पूजेनेच धर्मैक्य व देशैक्य करून थांबले नाहीत, तर त्यांना चार धामांचीही स्थापना करून त्या चारही दिशांमध्ये अगदी शेवटच्या सुरक्षित स्थानांवर आपले शिष्य बसवून धर्मजागृतीचीं चार मोठी केंद्रेच त्यांनी जागृत केली.येथे हैं स्मरण ठेवावयाचें कीं, शंकराचार्यांनी पूर्वी कधीं नव्हता तो एकोपा केलेला नसून, जो अनादिकालापासून चालत आलेला होता तोच एकोपा १ ज्ञानकोशः जग व हिंदुस्थान, खंड १, पृ. ४४ हे
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/86
Appearance