७६ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व हैं स्वाभाविक आहे. परंतु हिंदुत्वाच्या राजकीय तत्वज्ञानाशी अर्थाअर्थी ज्यांचा संबंध नाही अशा गाडगीळ, टंडन, कृपलानी, चंदावरकर ह्यांच्यासारख्यांनाही हिंदु नी हिंदुत्व ह्यांविषयीं आत्मीयता नी अभिमान वाटतो तो कां ? असा कोणता मोह त्या संज्ञांमध्ये आहे ? । ह्या प्रश्नाचे उत्तर हेच की, ‘हिंदु हा शब्द उच्चारतांक्षणींच गेल्या सहस्रों वर्षांपासून चालत आलेल्या, हिंदूंच्या ऐहिक नी पारमार्थिक अशा तेजस्वी नी दिव्य परंपरेचा साक्षात्कार त्या शब्दांनी कोणाही हिंदूस होतो; आणि यामुळेच हिंदुमात्रास मी हिंदु आहे ह्याचा उपजतच अहंकार असतो.' । वर उद्धृत केलेल्या अनेक ऐतिहासिक नी वर्तमानकालीन उतान्यांवरून हे निर्विवादपणे दिसते की, शतकानुशतके ‘आपण हिंदु आहोत ह्याची जाणीव नी अहंकार हिंदुसमाजामध्यें होता, आणि आजही आहे. हिंदुसमाजपुरुषाच्या जीवनेतिहासाच्या या प्रदीर्घ कालौघांत चमत्कृतिजन्य अशा विविध घडामोडी झालेल्या दिसतात. इतिहासाचे लुप्तस्मृति झालेले पान जर पुन्हां हाती लागले तर, कितीतरी घटनांचा उलगडा होईल. याच काळांत परकीयांच्या असंख्य स्वाच्या सामाजिक घडण -विघडण –भिन्न सांप्रदायिक विचार–भौतिक नी आध्यात्मिक तत्वज्ञानांची निर्मिति-ऐहिक विभवाचा चढलेला उन्माद, तर त्याच ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवून चिदानंदांत विलीन झाल्याने चढलेली धुंदी,-- अशा प्रकारचे कधीं परस्पर पोषक, कधीं परस्पर विरोधी तर कधी एकमेकांशी समांतर असलेले असे अनेक ओघ निर्माण झालेले दिसतात ! या ओघांच्या संगमांतच वैभवशाली नि दिव्य अशी हिंदु संस्कृति निर्माण झाली. कालचक्रासमवेत हिंदु समाजही फिरत होता. परंतु त्यांत एक घटना मात्र स्थिर होती. ती म्हणजे ‘हिंदु' ह्या शब्दाविषयींची ममत्वभावना आणि त्यायोगे निर्माण होणारे एकत्व. वंश, भाषा, परंपरा, इतिहास,
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/85
Appearance