Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व आतां हिंदूचीं मुसलमानांकडे पाहण्याची दृष्टि ते म्हणतात तशी खरोखरच असती, नी त्यांच्यावर खरोखरच हिंदूंकडून बलात्कार होत असता तर पाकिस्तानची मागणी करण्यासाठी मुसलमान असा एकही उरला नसता ! किंबहुना हिंदुस्थानांतील मुसलमानांची वर्षानुवर्षे वाढत्या प्रमाणावर असलेली लोकसख्या ही त्यांच्या वरील विधानांचे वैयर्थ्य सिद्ध करण्यास पुरेशी आहे. मुसलमानांना हिंदूनी परक्यासारखे वागविलें हा आपला आरोप जिना कधीही सिद्ध करू शकले नाहीत. याविषयी रेजिनाल्ड कुपलंड' म्हणतात :-

  • निःपक्षपाती संशोधकास अभ्यासान्तीं. असे आढळेल कीं, जे आरोप काँग्रेसवर करण्यात आलेले होते ते सर्व फुगविलेले असून ते मुळीच महत्त्वाचे नव्हते. जी कांहीं गाहाणीं होती त्यांच्या मुळाशीं काँग्रेसमधील कांहीं अविचारी लोकांचा मूर्खपणा होता. काँग्रेस बुद्धिपुरस्सर मुस्लिमविरोधी कार्य करीत होती हैं म्हणणे कधींहि सिद्ध झालेले नाही.’’ काँग्रेस मुस्लिविरोधी कार्य करीत नव्हती इतकेच नव्हे तर, हिंदी राष्ट्रवादाची आपली भूमिका यशस्वी करण्यासाठी तिने मुसलमानांना वळविण्याचाच अव्याहत प्रयत्न केला. पण स्वतः जिनांनीच म्हटल्याप्रमाणे “ एखाद्या देशांतील मुसलमान स्वदेशांत राहणाच्या मुसलमानेतरांपेक्षा किती तरी पटीने अधिक सहानुभूति परदेशांत राहणाच्या मुसलमानांविषयीं बाळगत असल्याने हिंदुस्थानांत निवसणाच्या सर्वांच्या एकजिनसीपणावर आधारलेला हिंदी राष्ट्रवाद यशस्वी होईल कसा ? असो.

१ कॉस्टिटयूशनल् प्रपोझल्स् ऑफ् दि सपू कमिटी; पृ. १५७ २ इंडियाज् प्रॉब्लेमः पृ. ५१-५२ (अखंड भारतच कां ?, पृ. १३७)