इस्लामी राष्ट्रवाद ४७ न्यायाधीश-हा प्रश्न अप्रस्तुत आहे. ओक-ठीक, तो प्रश्न मी निराळ्या स्वरूपांत विचारित. देसाई महाशय, लीगेतर मुसलमान राष्ट्रीय' आहेत का ? श्री. देसाई—नाहींत. यावरून लींगवाले काय किंवा लीगबाहेरील काय, सर्वच मुसलमान अराष्टीय कसे आहेत हे दिसते. आमच्या ह्या विधानास श्री. वल्लभभाई पटेल यांच्या पुढील उद्गारांनी बळकटी येते. (३) एकदां एका व्याख्यानांत सरदार पटेल म्हणाले-‘‘ नऊ महिन्यांच्या मध्यवर्ती मंत्रिपदाच्या अनुभवाने आमचा भ्रमनिरास झाला. मला असे आढळून आले की, वरिष्ठांत वरिष्ठ मुस्लिम अधिकान्यापासून तौ कनिष्ठांत कनिष्ठ द्वारपालापर्यंत, कांहीं थोडे अपवाद सोडून, सर्व मुसलमान लीगवाले आहेत.’ वरील उदाहरणांवरून हे ध्यानात येईल की, मुसलमान हा नेहमी मुसलमानच राहतो, कारण त्याच्या मनावर असलेली ‘मिलत 'ची पकड़ कधींच दूर होत नाही. सतत प्रचारामुळे मुसलमानी मनावरील इस्लामी राष्ट्रवादाची पकड उलट अधिक घट्ट झाली; आणि त्यांतही तिला राजकीय परिस्थितीचे साह्य मिळाल्यामुळे हिंदुस्थानचे खंड पडून पाकिस्तान निर्माण झाले! असो. मुसलमानांच्या पाकिस्तान-मागणीचीं जी कारणे डॉ. आंबेडकर यांनी नि इतरांनी दिली आहेत त्यांपैकी दोन कारणे अशी :--मुसलमानांचा अनुभव असा आहे की, हिंदू लोक हे आपल्या संख्याधिक्याच्या जोरावर मसलमानांना एकाद्या परकीय देशांतील नागरिकांप्रमाणे वागवितात; आणि त्यांच्यावर बलात्कार करितात. १ केसरी : ८ जुलै ४७ ‘ चूक खरी उमगली काय ?
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/56
Appearance