Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी राष्ट्रवाद ४५ हे तुर्की, परशियन, अरबी वा हिंदुस्थानी कोणीही असोत, आणि त्यांच्यावर पाश्चिमात्य शिक्षणाचा संस्कार झालेला असो वा नसो, विचार, भावना नी भाषा यांच्या समान बंधांनी ते निगडित झालेले असतात. अशा प्रकारे निर्माण झालेला बंधुभाव धार्मिक श्रद्धेतच गुरफटलेला नसतो. उलट मुसलमानांतील संशयवादी नि निरीश्वरवादी यांसही तुर्कस्तान अथवा पर्शिया यांवर कोसळलेल्या आपत्तींचा धक्का एखाद्या सनातनी मुल्लाला बसावा इतका मोठा बसतो.” अशी आहे ही इस्लामी मनोवृत्ति ! आणि यामुळेच हिंदी राष्ट्रीयत्वास ती विघातक ठरते. देशभक्ति नि वंशभक्ति यांपासून ती मुक्त असल्यामुळे, ज्याक्षणी एका देशांतील जनतेचा अन्य देशीय मुसलमानांशी विरोध येतो त्यावेळीं, पहिल्या देशांतील मुसलमान हे स्वदेशांतील मुसलमानेतरांऐवजी परदेशस्थ मुसलमानांचीच कड घेतात हें अत्यंत आपत्काली सिद्ध झालेले आहे. उदाहरणार्थः । सिंधच्या दाहीर राजाच्या हाताखाली ५०० अरबांची एक टोळी होती. तिचा नायक ‘अलाफी' नामक अरब होता. दाहिराने त्याला महंमद कासिमाविरुद्ध लढण्याची आज्ञा केली असता त्याने उलट उत्तर दिले की, ‘‘आम्हीं मुसलमान असल्यामुळे इस्लामच्या सैन्याविरुद्ध लढण्यासाठी आमची तरवार म्यानांतुन बाहेर निघणार नाही. तसेच तालिकोटच्या लढाईत विजयनगरच्या रामरायाच्या सैन्यांत मुसलमान पथकें होती. त्यांनी तर आयत्या वेळीं शत्रुस मिळून ज्याचे अन्न खाल्ले होते त्याला सपशेल तोंडघशी पाडले. पानिपतच्या युद्धाच्या वेळीही सर्व हिंदी मुसलमानांचे साह्य उत्कृष्ट रीतीने मिळाल्यामुळेच अब्दालीस जोर आला होता ! १ द. के. केळकर : संस्कृति संगम, पृ. ३१२ २ सरदेसाई : मराठी रियासत, भाग ३, पृ. १२१