४४ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व | (२) नेपाळांत" छत्तीस ठिकाणीं मुसलमान बहुसंख्य आहेत. त्या गांवांनीं, तेथील काँग्रेसच्या हाताला हात लावून, राजसत्ता उलथवून टाकण्याची उत्सुकता प्रकट केली आहे. राजसत्ता नष्ट झाल्यावर मुसलमानांना नेपाळमध्ये एक स्वतंत्र भाग तोडून हवा आहे. वस्तुतः एकाच भूभागांत जन्म झाला असल्याने, त्या भागांतील इतरांप्रमाणे मुसलमानही तेथेच लहानाचा मोठा होऊन पैगंबरवासीही तेथेच होणार असतो. तथापि त्याच भूमीवरील दुस-या समाजांपासून आपला पृथक् निवास ठेवण्याची, नी धर्म भिन्न या सबबीवर त्यांच्याशी फटकून वागून विरोधी भूमिका स्वीकारण्याची वृत्ति मुसलमानांमध्ये कां निर्माण होते, याचे विवेचन वर इस्लामी राष्ट्रवादामध्ये झालेंच आहे. परंतु हॅन्स कोहेनने दिलेला आगाखानांच्या भाषणांतील उतारा वाचला म्हणजे मुसलमानांत पृथक् मनोवृत्ति निर्माण करणा-या इस्लामी विचारांचे स्वरूप स्वच्छ दिसते. तो उतारा असा :-
- हिंदुस्थानांतील मुसलमानांना इंग्रजांनी दिलेल्या शिक्षणामुळे त्यांच्यांत राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा प्रादुर्भाव झाला आहे. तरीहि त्यांच्या मनोविकारांना हिमालयाची उत्तुंग शिखरे किंवा भारतीय सागर मर्यादा घालू शकत नाहीत. त्यांच्यांत नी इतर देशांतील मुसलमानांत नैसर्गिक ऐक्य असते. वंश अथवा देश यांच्या मर्यादा ह्या ऐक्याच्या आड येऊ शकत नाहीत कारण हैं ऐक्य केवळ सांप्रदायिक श्रद्धेवर अवलंबून नाहीं. कुराणच नव्हे तर अरबी इतिहास आणि तत्त्वज्ञान, पर्शियाचें अतुलनीय काव्य, तसेच इजिप्त, स्पेन नी मोरोक्को ह्या देशांतील काल्पनिक गोष्टी नी दंतकथा ह्या सर्वांच्या वैभवशाली परंपरेचे ते वारसदार आहेत. ह्या अक्षय झण्याचे जीवन मुसलमान प्राशन करीत असल्याने, मुसलमान
१ केसरी : २.५-५० ‘ मूळ स्वभाव कसा जाणार ?’ २ प्रो. हॅन्स कोहेन : नेशनॅलिझम् इन फार ईस्ट, पृ. ४७