Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदी राष्ट्रवाद । २९ असो. हिंदी-राष्ट्रवाद या अभिनव कल्पनेचा सतत प्रचार झाल्याने एकरसी, एकसंधी हिंदी समाजपुरुष उभा असल्याची भुलावू परिस्थिति निर्माण झाली. अर्थात् ‘हिंदी राष्ट्र’ ही कल्पना जर फलद्रप होती, तर सोन्याहून पिवळे झाले असतें ! कारण तसे पाहिले तर, ‘हिंदी राष्ट्र’ या विचाराशीं कोणाही. विवेकी व्यक्तीचा विरोध कसा असणार ?

अशा प्रकारे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राजकीय चळवळ चालली होती. ह्या चळवळीचा पाया ‘जाति-धर्म-निरपेक्ष हिंदी-राष्ट' हाच होता. ह्या चळवळीमुळे कांहीं राजकीय मागण्या मान्य होणार असे दिसतांच, मुसलमानांना आपण अल्पसंख्य आहोत याची जाणीव झाली. आणि मग आपण अल्पसंख्य असल्यामुळे संरक्षण आणि विशेष सूट मागण्याचा आपणांस अधिकार आहे असा मुसलमानांचा ग्रह होऊन तसा प्रचार त्यांनी आरंभिला. विभक्त-मतदार-संघाची मागणी करण्यांत येऊन १९०५ मध्ये मुस्लिम लीगची स्थापनाही झाली. या नवीन घटनेने भारतान्तर्गत राजकीय विचारांत नवीन अडथळा उभा केला. कारण आतांपावेतों प्रचलित असलेली विचारधारा हिंदी-राष्ट्राची होती. आतां तद्विरुद्ध विचार मांडण्यास मुसलमानांनी आरंभ केला. आम्हीं मुसलमान निराळे

आहोंत, म्हणजे अल्पसंख्य आहोत, याचा स्पष्ट अर्थ ‘आम्हीं हिंदी नाहीं असाच झाला. मुसलमानांची पृथक्पणाची आणि अल्पसंख्यकत्वाची भावना, ‘हिंदी राष्ट' या कल्पनेशीं मूलतः विरोधी आहे. मुसलमान अल्पसंख्य आहेत, म्हणूनच त्यांना विशेष अधिकार आणि संरक्षण । मिळालेच पाहिजे, असे १९०९ मध्ये ब्रिटिश सरकारकडून ट. आर्. बचनन यांनी सांगितले. १९१६ मध्ये काँग्रेसनें लीगशीं जो लखनौ-करार केला त्यामध्ये मुसलमानांचा अल्पसंख्य असल्याचा अभियोग उघडपणें मान्य करण्यात आला. परंतु अशाप्रकारे मुसलमान अल्पसंख्य आहेत हा अभियोग मान्य करतांना, हिंदी राष्ट्रवाद अयशस्वी आणि विकलांग झाला आहे ही गोष्ट दृष्टिआड झाली. समान संकटानें राष्ट्र निर्माण होऊ शकते.