Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व २. ह्या राष्ट्रवादाचा विशेष म्हणजे प्रादेशिक एकतेवर त्यांत दिला गेलेला भर. म्हणूनच ही राष्ट्रवाद ‘ प्रादेशिक राष्टवाद' या नांवानेही संबोधिला जातो. असो. स्वराज्याच्या एकमुखी मागणीसाठी भिन्न भिन्न लोक-समुदायांच्या एकीची आवश्यकता होती. इंग्लडांतील राष्टभावनेचा आदर्श डोळ्यासमोर असल्याने, आणि इंग्लिश राजवट चालू असल्याने त्यावेळीं प्रादेशिक कल्पनेस अधिक महत्त्व प्राप्त व्हावे यांत आश्चर्य नाही. हिंदी लोकांस एकत्व देणारे घटक म्हणून ब्रिटिश शासनाविरुद्ध असलेले समाईक द्वेष आणि वैर, एक निवासस्थान, समान आर्थिक हितसंबंध, एकच रम्य भविष्यकाळ यांवर भर देण्यांत येऊन हिंदी-राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान निर्मिले गेले. ‘हिन्दूचा हिन्दुस्थान' ही शंकडों वर्षापासून चालत आलेली विचारसरणी दूर सारून, तत्कालीन पुढान्यांनी हिंदी राष्ट्रवादाची नवीन वैठक घातली; आणि पुढील शिकवणीस आरंभ केला :-हिन्दुस्थानांतील सर्व जनता हिंदी असून प्रत्येकानें अतःपर आपणांस हिंदी समजले पाहिजे. हिन्दुस्थान हा हिन्दुस्थानांत निवसिणाच्या सर्व लोकांचा आहे. आणि म्हणूनच ह्या देशभूमीवर सर्वांनी प्रम केले पाहिजे इतकेच नाही तर, ह्या भूमीस गौरवाप्रत नेण्याचा प्रयत्न हिन्दुस्थानच्या प्रत्येक नागरिकानें निष्ठेने केला पाहिजे. हिन्दुस्थानच्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितींत या अभिनव विचाराला विरोध करण्याची कोणांतच शक्ति नव्हती. ही अभिनव विचारधारा में राजकीय स्वातंत्र्य मिळविणाच्या चळवळीच्या हातांतील साधन समजले गेल्यामुळे कोणी तिला विरोध करणे तेव्हां शक्यही नव्हते. ‘राष्ट्रीयत्व ही निराळी वस्तु आहे, नि म्हणूनच तिचा विचार निराळ्या रितीने झाला पाहिजे; स्वातंत्र्याचा आणि राष्टीयत्वाचा घोंटाळा करणे योग्य नाही, हा विचार सावरकरांनी प्रथम मांडला. पण तो विषय येथे प्रस्तुत नाहीं.