Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ पाश्चिमात्य राष्ट्रवाद तोंडवळ मंगोलियन आहे. वरील सर्व उदाहरणे हेच दर्शवितात की राष्ट्रनिर्मितीस ‘वंशैक्य' अनिवार्य नाहीं. आतां ‘एक भाषा' हा घटक ध्या :- एका भाषेमुळे जर राष्ट्रनिर्मित होत असती तर, दक्षिण नि मध्य अमेरिकेत स्पॅनिश भाषेचे वर्चस्व असूनही तेथील लोकांना स्पेनविषयों ममत्व वाटावयाला हवे. परंतु तशी वस्तुस्थिति नाही. इंग्लंड नि अमेरिका एकभाषी असूनही त्यांचे एक राष्ट्र बनले नाही. उलट स्कॉटलंड हे एक राष्ट असूनही त्यांतील काही लोक गेलिक भाषा बोलतात तर कांहीं इंग्रजी. स्वित्झर्लंडमधील जनता फ्रेंच, जर्मन नि इटॉलयन भाषा बोलते; तरी ते एक राष्ट्र आहे. बेल्जियममधील लोक फ्लेमिश, फ्रेंच नि जर्मन भाषा बोलतात. आयलंडांत आयरिश नि इंग्लिश भाषा बोलल्या जातात. कॅनडांतील लोक इंग्लिशमध्ये बोलतात तसेच फ्रेंचमध्येही बोलतात. स्वीडिश भाषा ही फिनलंडमध्ये पण बोलली जाते. दक्षिण आफ्रिका नि वेल्स यांतहीं एकाहून अधिक भाषा बोलल्या जातात. तेव्हां, ‘एक भाषा' हा राष्ट्रांना राष्ट्रपणा देणारा अत्यंत बलशाली घटक असला तरी तो अपरिहार्य नाही. तसेच तेवढा एकच घटक असूनही कार्यभाग होत नाही. * एक धर्म' हा घटक आतां ध्या :- मूर म्हणतो :-.* धार्मिक एकता हा एक राष्ट्र-घटक समजला जातो. किंबहुना धर्मभिन्नता ही राष्ट्रीयत्वास विघातक ठरते असे म्हणणेच अधिक सयुक्तिक. डच नि बेल्जियन लोकांना एका शासनसंस्थेखालीं राहणे अशक्य झाले ते त्यांच्यातील धार्मिक भिन्नतेमुळेच ! तसे पाहिले तर, भाषा नि वंश या बाबतींत बेल्जियनांमध्ये जितकी अंतर्गत विभिन्नता होती, तितकी कांहीं त्यांच्यातील काही लोक आणि डच यांच्यात नव्हती.