१८ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व एकता लाभूनही हंगेरियनांत राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण झालेली नाही.” (पृ. ३८ ) आतां ‘ एक वंश' हा घटक घेऊं :- | राष्ट्रांतील जनता एकवंशीय असलाच पाहिजे ही वस्तु विज्ञानास असंमत आहे. इतिहासाच्या अभ्यासावरूनही असे आढळतें कीं, प्रत्येक राष्टांत भिन्न भिन्न वंशांची सरमिसळ झालेली आहे. म्हणूनच राष्ट्राच्या निर्मितीस वंशैक्य अपरिहार्य नसते. डॉ. ओके स्मिथ याने आपल्या * रेस अँड् नॅशनैलिटी' या ग्रंथांत हैं अत्यंत उद्बोधकपणे मांडले आहे. ज्यू समाज हा इतरांपासून शेकडो वर्षे निराळा राहात असल्यामुळे त्यास आपला वंश इतर समाजांपासून पृथक् नि शुद्ध ठेवता आला, असे सामान्यपणे मानले जाते. परंतु मानवजातिशास्त्राला (Anthropology) हे मत संमत नाही. हे शास्त्र म्हणते की, ज्यू समाज एकवंशीय नाही; उलट ज्यूंच्या रक्तांत दक्षिण नि पूर्व युरोप, आणि नॉर्डिक नि पौर्वात्य देश यांतील रक्तांचा संकर झालेला आहे. पोर्तुगीज रक्ताचा निग्रो रक्ताशीं संकर झालेला आहे. स्पेनमध्ये स्पॅनिश रक्ताचा मूरिश रक्ताशी, तद्वतच न्यूझिलंडमधील मेओरिस रक्ताचा युरोपीय रक्ताशीं संकर झालेला आहे. अमेरिका में तर भिन्न वंशांच्या संकराचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आधुनिक इटालि रोमन ट्युटॉन्स, एट्युस्कन्स, ग्रीक, अरब इत्यादि जमातींच्या, रक्तसंकरांतूनच निर्मिले गेले. फ्रान्समध्येही गोल, रोमन, ब्रिटन्स, ट्युटन्स, इत्यादि लोकांचा संकर झालेला आहे. इंग्लंड, जर्मनि, रशिया या देशांत सुद्धा रक्तसंकर झाला नाही असे नाही. राशियन महाकवि पुष्किन नि विख्यात लेखक ड्यूमा द्वय यांच्या रक्तांत युरोपीय नि निग्रो रक्तांचा संकर झालेला आहे. डॉस्टोव्हस्की, टॉलस्टॉय आणि गॉर्कि ह्या रशियन लेखकांचा
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/27
Appearance