१०७ मार्क्सवाद आणि बोल्शेव्हिक रशिया युगांतील असामान्य पंडित, ‘ जुन्या नेतृत्वाचा प्रथम श्रेणीचा प्रतिनिधी असा पक्रोव्हस्कीच्या मृत्यूनंतर सरकारकडून आणि पक्षाकडून त्याचा गौरव करण्यात आला. त्याने १९२० च्या सुमारास लिहिलेल्या ‘ब्रिफ् हिस्टरी ऑफ् रशिया' ह्या पुस्तकाचे उत्साहाने स्वागत झाले. लेनिनकडून नुसते स्वागतच केले गेले नाही तर, त्याच्या सुचनेवरून ब-याच भिन्नाभिन्न भाषांतून त्याची भाषांतरे प्रसिद्ध झाली. परंतु आतांपावेतों प्रमुख समजल्या गेलेल्या पोक्राव्हस्कीच्या वैचारिक शाखेवर १९३६पासून मानहानीचा प्रसंग आला असून त्याच्या मतांचा पुरस्कार हा दंडनीय अपराध ठरला आहे. लेनिनचा हा पूर्व-आश्रित आणि त्याचे अनुयायी हे अनैतिहासिक नि काल्पनिक समाजशास्त्रीय सिद्धांतांच्या साह्याने सत्य ऐतिहासिक घटनांवर असत्याचा मुलामा चढविणारे आहेत, आणि ते आंतरराष्ट्रीय डाव्या गटांतील असून रशियन इतिहासातील राष्ट्रीय हेतुंचा परामर्ष कधीच घेत नाहीत, असे त्यांच्यावर आरोप आहेत. रशियाच्या भूतकालाविषयी लेनिनइतकाच पाक्रोव्हस्कीसही तिटकारा होता. रशियन राष्ट्रीय चिन्हांप्रमाणे, रशियाचा इतिहास हा त्याच्या मते प्रतिक्रांतीचा पर्याय होता. सोव्हिएट युनिअनने राष्ट्रवादाची कांस धरतांक्षणींच इतिहासाच्या अशा प्रकारच्या भाष्यांचा त्याग केला गेला हे स्वाभाविक आहे. १९३७ मध्ये सर्व सोव्हिएट शाळांसाठी इतिहासाचे पाठ्यपुस्तक म्हणून लावण्यात आलेले आणि पारितोषिकार्ह ठरलेले सेस्टाकोव्हचे पुस्तक * आमचे स्वदेशावर प्रेम आहे आणि म्हणूनच त्याच्या अद्भुत इतिहासाचे ज्ञान आम्हांस असलेच पाहिजे' या ध्येयाने लिहिलेले आहे. आतां ऐतिहासिक घटनांकडे केवळ ‘वर्गविग्रहाच्या दृष्टिकोनातून पहाण्याचे सोव्हिएट इतिहासकारांनी सोडून दिले आहे. ज्या कांहीं घटनांचा विचार निराळ्या दृष्टीकोनांतून करण्यात येत आहे त्यांची ‘राष्ट्र, राष्ट्रीय झगडे, राष्ट्रीय इच्छा नि राष्ट्रीय आकांक्षा इत्यादि उदाहरणे होत.
पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/116
Appearance