Jump to content

पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६०६ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व अंगीकार केला होता, त्यांना तिचा त्याग करून पुन्हां रशियन लिपीचा अंगीकार करावा लागला आहे. राज्यक्रांतीनंतरच्या पहिल्या काही वर्षांत, रशियन भाषेने लॅटिन लिपीचा अगिकार करावा अशी जी चर्चा चालत असे, ती आतां कोठेही ऐकू येत नाही. टर्कमेनिस्थान किंवा अर्मिनियासारख्या सोव्हिएटमधील इतर प्रजासत्ताक गटांमध्ये १९२८ पूर्वी रशियन वर्तमानपत्रे मुळीच नव्हती. पण आतां मात्र ती ब-याच प्रमाणांत प्रसिद्ध होत असून त्यांची संख्याही वाढती आहे. | राष्ट्रीय महाकाव्य में राष्ट्रीय भावनेस उत्कट करण्याचे कार्य पौराणिक कालाप्रमाणे आजही करीत आहे. रशियन लोकगीतांत ‘बोगटी' नांवाचे कल्पित नायक आहेत. पूर्वी रंगभूमीवर त्यांच्यावर टीकास्त्रं धरण्यात आली होतीं. १९३६ मध्ये ‘रशियन व्यक्तिमत्त्वांतील शौर्याची निदर्शक चिन्हे म्हणून त्यांचे समर्थन झाले. ज्या नाटकांतून ती टीका होती, ती नाटके बंद करण्यात आली. रशियाच्या राष्ट्रीय बुद्धिवैभवाचा पौराणिक वाङ्मय हा पुरावा आहे, असें आज सोव्हिएट युनिअनमध्ये मानण्यात येत आहे. क्रांतीच्या सुरवातीच्या काळांत वाङमयाचे मार्क्सवादी टीकाकार हे पुष्कीनला केवळ सरंजामदारी लोकांचा वैचारिक नेता समजत, आणि त्याचा बौद्धिक वारसा सद्यःस्थितीत अव्यवहार्य असल्याचे ते मानीत. याच कवीचा शतसांवत्सरिक स्मृतिदिन, १९३७मध्ये, सरकारी सूचनेनुसार अखिल सोव्हिएट युनिअनमध्ये, प्रचंड प्रमाणावर साजरा केला गेला. रशियाच्या भूतकालाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांतही विशेषेकरून मूलभूत पालट झालेला दिसतो. राज्यक्रांतिकारक चळवळी सोडल्यास बाकींचा सर्व भूतकाळ काळाकुट्ट असल्याचे चित्रण रशियन इतिहासकारांकडून झालेले आहे. इतिहासशास्त्राच्या शाखेत, रशियाच्या राज्यक्रांतीपासून पुढे पंधरा वर्षे, पाक्रोव्हस्की नांवाचा मार्किसस्ट हा एक भयप्रद असा हुकूमशहा होता. वर्ष १९३२ मध्ये ते मृत्यु पावला. ‘आपल्या