पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व (२) धंदेवाले व व्यापारी यांचे तर्फे निवडण्यात आलेले, व (३) सुमारे शापर्यंत सभासद स्थानिक सरकारांनी नेमलेले. दिस्ट्रिक्ट बोडीत लोकल बोर्ड आपलेपैकी सभासद नेमतात, व शिवाय व्यापारी व धंदेवाले यांचे तर्फे सभासद सरकार नेमणुकीचे किंवा लोकांनी निवडलेले असे असतात, व शापेक्षा जास्त नाहीत असे सरकारांनी नेमलेले असतात. दोन्हीही बोर्डीस आपले चेरमन निवडण्याचा अधिकार आहे. लोकल बोर्डे हो दिस्ट्रिक्ट बोर्डाचे अंकित अशी ठरविली आहेत. शाळांचेसाठी विशेष कमिटया नेमण्याचा व अनेक दिस्ट्रिक्टांचा किंवा लोकल वोर्डीचा एखादे कामांत संबंध असेल तर त्या सर्वांचे तर्फे संयुक्त कमिटी नेमण्याचा अधिकार ठेवला आहे. या वोर्डीकडे रस्ते करणे, शाळा, दवाखाने घालणे, व त्यांची व्यवस्था पाहणे, मार्केट व धर्मशाळा वगैरेसारखी सार्वजनिक कामें करणे, किंवा तलाव किंवा विहिरी बांधणे, झाडे लावणे, वगैरे कामें सोंपविली आहेत. सन १८९१।९२ सालांत शेकडा ४० सभासद सभांस हजर होते. जिल्हे बोडापेक्षां पोटविभागाचे बोर्डीत कमी हजर असत; याचे कारण जिल्हे वोर्डी- कडेसच महत्वाचे सर्व अधिकार ठेवले आहेत हे आहे. या बोर्डाचे मार्फत या साली पुष्कळ रस्ते दुरुस्त करण्यांत आले. पुढे व्हिलेज सानिटेश- नचे (गांवगंनाची सफाई) कामासाठी दरसाल कांहीं रक्कम खर्च करण्याचे ठरले आहे. प्राथमिक शिक्षण या बोडांकडेसच सोपविण्यांत आले आहे, व त्या शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी खासगी शाळांस मदत देण्याची वहिवाट जास्त वाढविण्याचेही ठरले आहे. आसाम प्रांतांतही स्थानिक स्वराज्यव्यवस्था सन १८७९ चे रेग्युलेशन- प्रमाणे चालू झाली. त्या कायद्यांत १८८२ साली कांही दुरुस्ती करण्यांत आली व इतर प्रांतांत जशी सुधारणा होऊन बोर्डे स्थापन झाली तशीच याही प्रांतांत स्थापण्यांत आली. निवडणुकीचे तत्व प्रचारांत आहे व कांहीं सभासद सरकारनेमणुकांचे असतात. चहा पिकणारे जिल्ह्यांत युरोपिअन चहा लावणारे लोकांस आपले तर्फे सभासद निवडतां येतो व वाकीचे सभासद नेटिव कर देणारांचे तर्फे निवडलेले असतात किंवा त्यांचेपैकीच सरकार नेमतें. जंगली प्रांतांत याप्रमाणे व्यवस्था अमलांत आली नाही. एकंदरीत या बोडौंकडून पाण्याचे बाबतीत व्यवस्था चांगली झाली आहे, परंतु सफाईचे कामाकडे त्यांनी फारच कमी लक्ष दिले आहे. चहाचे लागवडीचे जि- ल्ह्यांत युरोपिअन सभासद रस्त्याचे कामावर फार चांगली देखरेख करतात. वहाड प्रांतांत हैदराबाद येथील रेसिडेंटाचे मार्फत व्यवस्था होते व