पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रु.८०८०. २. २४०, वायव्यप्रांत रु. १३४३०, पंजाव रु. ११४५०, मध्यप्रांत रु. ५०, ब्रह्मदेश रु. २०३५०, मद्रास रु. २५७८०, मुंबई रु. २८७५०) रु. २६०५५०. (१८) शिलकी खजिना (हिंदुस्थानसरकार रु. ५०५०, मद्रास रु. ३.३०) (१९) प्रेसिडेन्सी व्यांका-(हिंदुस्थान सरकार रु. १६३३५०, बंगाल रु. १४३७०, मद्रास रु. ३२१६०, मुंबई रु. ७५२९० ) रु. २८५१७. (२०) लोकल फंडाचे नौकर लोक जनरल-(हिंदुस्थानसरकार रु. १२९०, बंगाल रु. २९७१७०, आसाम रु. २५९०, वायव्य व अयोध्या प्रांत रु. ५३१५०, पंजाव रु. १२४९२०, मध्यप्रांत रु. २७५६०, ब्रह्मदेश रु. ११०६०, मद्रास रु. २७५३१०, मुंबई रु. १०४९३०) रु. ८९२९८०. (२१) विलायतेंतून आणलेले स्टोअर ( सामान ) हिंदुस्थानसरकार रु. १९५६००. (२२) विलायतेंत होत असलेला खर्च व हुंडणावळ रु. ३३८३३४० बेरीज रु. १७९१३१७० (१) लोकमत व विशेष माहिती-येथपर्यंत हिंदुस्थानांतील राज्य- व्यवस्था करणारे अधिकारीवर्गाचे वर्णन झाले व त्या वर्गातील मुकुटमणि जे व्हसराय-राजप्रतिनिधि-त्यांचेपासून तो राजसत्तेचे विभागांतील कनिष्ट पायरी जी गांवकामगार मंडळी तेथपर्यंत परिनालिका आणून पोचविली. आतां या सर्व अधिकारांचे उद्गमस्थानासंबंधानें चार शब्द सांगणे जरूर आहे. साधारण व्यव- हारांत राज्याची स्वामिणी इंग्लंड देशाची राणी व हिंदुस्थानची बादशाहीण आहे असें ह्मणण्याचा प्रघात आहे, परंतु हा सर्व उपचाराचा भाग आहे. वस्तुतः राजता (साव्हरेंटी) ह्मणजे राजकीय समाजाचे शास्त्यास असलेले अधिकारसर्वस्व, त्याचे निधान बादशाहीण नाहीं; ते राणी किंवा राजा, दोन पार्लमेंटें ह्मणजे हाउस आफ्. लार्ड्स व हाउस आफ कामन्स यांचे समुच्चयांत आहे. त्या अधिकाराची वादशाही. ण एका प्रकाराने भोगमूर्ती आहे. व्हैसराय ह्मणजे राजप्रतिनिधि हे फक्त राणीचेच प्रतिनिधि नसून सदरचे समस्त राजसत्तात्मक संस्थेचे प्रतिनिधि आहेत. कोण- तेही राजसंस्थेस सर्व राज्यांत अधिकार स्वतः चालविणे शक्य नसते, तेव्हां तो अधिकार काही अंशाने इतरांस सुपूर्त करावा लागतो, त्याप्रमाणे हिंदुस्थान- चा कारभार व्हैसरायसाहेबांकडे सोपविण्यात आला आहे. (२) हिंदुस्थानचे स्टेटसेक्रेटरी-व्हैसरायसाहेबांचे नियमन करण्या- चा अधिकार हिंदुस्थानचे स्टेटसेक्रेटरी यांस आहे असें वर सांगितलेच आहे, त्या-