पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२) वरील कोष्टकांतील तपशील सन १८७०-७१ पासून सन १८९२-९३ पर्यं- तचा आहे. सर रि. टेंपलसाहेव हिंदुस्थानसरकारचे फडणवीस असतां त्यांनी सन १.३५ पासून १८७१ पर्यंत ही व्यापाराची वाकी कोणाकडे किती फिरते याचा हिशेव करून तिजबद्दल तपशील दाखविला होता तो असा:- त्या ३६ वर्षात व्यापारी माल १०१२ कोटि रुपयांचा परदेशी गेला व ५८३ कोटींच माल परदेशांहून या देशी आला; या मुदतीत सोने-रुपें ३१२ कोटी रुपयांचे आले व ३७ काटीचे परदेशांत गेले ; ह्मणजे निवळ सोने-रुपें २७५ कोटींचे इकडे साहेलें ; बजावाट होतां १५४ कोटी रुपयांबद्दल व्यापारी तन्हे- चा मोबदला आलेला नव्हता, अशी वाकी राहिली. तीतून हिंदुस्थानचे स्टेट. सेक्रेटरी यांचे मार्फत विलायतेंत होणारा खर्च ११३ कोटी रुपये झाला होता, तो वजा केला ह्मगजे खरी वाकी काय ती ४१ कोटी राहिली. त्या रकमेने खासगी व्यापारासाठी काढलेले कर्जाचे व्याज, इकडे नौकर लोकांनी शिलक टाकलेली रकम विलायतेस पाठविण्याची असते ती, मालाचे भाडे व इतर कजें चांची फेड झाली होती. सन १८७०-७१ पासून १८९२-९३ पर्यंत सोने-रुपें आले व परदेशांस गेलें त्याची वजाबाट करतां यो देशांत सोने ५८ कोटि ८० लक्षांचे राहिले, व रु १६५ कोटी २३ लक्षांचे राहिलें ; ह्मणजे एकंदर सोने-रुपें मिळून २२४ कोटी लक्षांचे राहिले. या तेवीस सालांची सरासरी काढली तर दरसाल सोने-रु कोटी ७४ लक्षांचे आले आहे. त्याचे पूर्वीचे कालाचा विचार पाहिला तर, १८३९-४० पासून १८५४-५५ पर्यंत दरसा अडीच कोटींचे व त्याचे पुढील पंधरा वर्षांत हणजे सन १८५५६ ते १८६९।७० पर्यंत दरसाल पंधरा वोटींचे सोने-रुपे येत गेले. या दुसऱ्या मुदतीत घडामोडी फार मोट्या झाल्या होत्या. बंडामुळे खर्च फार झाला होता व त्यानंतर राज्यकारभार सुव्यवस्थित करण्यासाठी आगगड्या वगैरे पब्लिक वर्क्सचों ग्यासाठी कर्ज काढण्यात आले; अमेरिकेतील लढाईमळे इकडील कापूस विला- यतेस फार गेला होता; त्याचे किमतीचा ऐवजही येणें होता; या सर्व गोष्टी मुळे या मुदतीत या देशांत पैसा पुष्कळ आला व त्यामुळे सोने व रुपे यांची सरासरी पुष्कळ वाढली. याचे पुढील मुदतीत सरासरी ९ कोटी ७४ लक्षांची पडते हें वर सांगितलेच आहे. सोने व रुपे किती येत असे ते वरील कोष्टकांत दिलेच आहे. सन १८९२-९३ सालापर्यंत दरसाल सोने व रुपे ह्या दोन्ही धातू येत असत; त्या साली मात्र सोने आले त्यापेक्षां २ कोटी ८१ लक्षांचे सोने जास्त गेले. सोन्याचे मानानें रुप्याची किंमत अलीकडे फार उतरत गेल्यामुळे कामें कर- खर्च वाढला, व