पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२९५) बीटपासून साखर काढू लागल्यापासून मारिशस वगैरे कडील साखर तेथें खपत नाहीशी झाली, तेव्हा ती हिंदस्थानांत पाठविण्याशिवाय गत्यंतरच नाहींसें झाले आहे, यामळे या देशांत साखर फार येते. या देशांतून परदेशांत साखर जाते ती शुद्ध केलेली नसते; तिकडून इकडे यते ती चांगली शुद्ध केलेली असत. चहा--चहा ये तो बहुतेक चिनांतनच येतो. सिलोन बेटाहून अलीकडे चहा येऊ लागला आहे. या चहापकी बराच इराण व अफगाणिस्थान या दे- शांस जातो. चिनांतील इकडे येणारा चहा हलका असतो व कमी किमतीस विकतो. सिलोन बेटांतील चहा चांगला असतो व तो मुंबईस जास्त येतो; कारण या प्रांतांत त्या चहास उत्तराहिंदुस्थानांतील चहाबरोवर किमतीसंबंधाने चढाओढ करण्यास सांपडते. प्रोव्हिजन्स--खाण्याचे पदार्थ--या सदरांत लोणी, मासे, मांस, मिठाया, चीझ, लोणची, मुरांबे, वाळविलेली व मसाला घातलेली फळे, खजूर, पीठ, तूप, वगैरे पदार्थ येतात. मध्यंतरी मिठावरील जकात वाढविण्यांत आल्यावर काही दिवस खार मासे फार येऊ लागले होते; त्यांजवर जकात बसविण्यात आल्यावर ते आतां कमी येऊ लागले आहेत. या वर्गातील बराच माल विलायतइन युरो- पिअन लोकांसाठी येतो. इराणचे अखातान व मक्राण किनाऱ्यावरून मुंबई व सिंध प्रांतांत तूप येते. वर्ग तिसरा-धातू व धातूचे पदार्थ-हार्डवेअर व कटलरी ( चाकू, काच्या व गैरे धातूचें सामान ). हा मोल बहुतेक विलायतेहूनच येतो तरी अलीकडे ज- मनी, ऑस्त्रिया व बेल्जम ह्या देशांतुन हा माल बराच येऊ लागला आहे. सन १८५३--९४ साली या देशांतून हा माल एकंदरीपैकी सुमारे एकपचमांश आला. या सालीं शिवण्याची यंतें किंमत रु. ४०४५०० ची आली. लोखंड व पोलाद--हें विलायतेहून मुख्यत्वें यों तरी आतां बेल्जम व जर्मनी- दूनही बरेंच येऊ लागले आहे. पूर्वीपेक्षां लोखंडाचे बदली पोलादाचा उप- योग जास्त होऊ लागला आहे. विलायतेहुन येणारा माल चांगला परंतु महाग असतो व जर्मनी व वेल्जम येथून येणारा माल हलका परंतु खस्ता असतो, यामुळे हा माल जास्त खपूं लागला आहे. तांचे-लोखंडाचे खालोखाल महत्वाची धातू तांबे आहे. तें चीन, विलायत, आत्रेलिया वगैरे देशांतून येते.