पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९४) मायात व्यापार-वर्ग पहिला-जिवंत प्राणी-या वर्गात महत्वाचा माल मणजे घोडेच आहेत. ते मुख्यत्वेकरून आस्त्रेलिया व तुर्कस्थानांतून येतात. इतर देशांतून थोडे येतात. वर्ग दुसरा-खाण्याचे पदार्थ-दारू-दारूचा व्यापार चांगलासा · वाढला नाही. ती विलायतेतून सर्वात जास्त येते; त्याचे खालोखाल फ्रान्स व जर्मनी देशांतून येते. या देशांतही विलायती नमुन्याची दारू करण्याचे कारखाने झाले आहेत. सन १८९२ साली २१ कारखाने चालू होते त्यांत एल, बियर, पोर्ट, या प्रकारची दारू ४८ लक्ष ग्यालन तयार झाली; त्यापैकी २७ लक्ष ग्यालन लष्क- रासाठी सरकारांनी खरेदी केली व बाकीची देशांत खपली. सन १८९२-९३ साली परकी दारू ४४ लक्ष ६२ हजार ग्यालन आली, त्यापैकी ११ हजार ग्यालन काय ती फिरून परदेशास गेली; बाकीची सर्व या देशांतच खपली. मीठ-मीठ येतें तें कलकत्ता व ब्रह्मदेशांतच येते. या व्यापारांत विशेषशी वाढ नाही. मीठ इतर देशांपेक्षां विलायतेहूनच सर्वांत जास्त येते, तरी पूर्वीपेक्षा जर्मनी, आस्त्रिया, व एडन येथून आतां जास्त येऊ लागले आहे. एडन येथे एक इटालियन कंपनीने मीठ तयार करण्याचा कारखाना सरकारच्या परवानगीने काढला आहे. जर्मनी व आस्त्रिया या देशांतून मीठ जास्त येण्यास कारण हा- म्बर्ग व कलकत्त्याचे दरम्य न आगबोटी आतां नियमाने येऊ लागल्या आहेत व सांत वजनासाठी मीठ घालून आणतात. मसाला-या सदरांत सुपारी, लवंगा, जायफळे, मिरी वगैरे जिन्नस येतात. सुपारी स्ट्रेटस् सेटलमेंट व सिलोन या देशांतून मद्रास व बंगाल प्रांतांत येते. लवंगा बहुतेक झांशिवाराहून येतात व एड्न, स्ट्रेट्स् सेटलमेंट वगैरे देशांतूनही कांहीं येतात. यापैकी पुष्कळ माल विलायतेस जातो. जायफळे व मिरी ही स्ट्रेटस् सेटलमेंटाहूनच बहुतेक येतात. परदेशांहून मिरी येतात त्याशिवाय या देशांत व त्रावणकोर संस्थानांत मिरी पुष्कळ पिकतात. साखर-साखर येते तींतील निम्मेपेक्षा जास्त मारिशस बेटाहून येते. त्याचे खा खाल चीन, जर्मनी, स्ट्रेट्स् सेटलमेंट व विलायत या देशातून येते. यापैकी समारे तीन हिस्से साखर पश्चिमहिंदुस्थानांत येते; कारण या भागांत साखर फारशी तयार होत नाही व उत्तरहिंदुस्थानांतील साखर या भागांत आणून विकण्यास पुरवत नाही. चीन व मारिशस येथील साखर फार चांगल्या व सुधारलेले कृतीने स्वच्छ केलेली असते व ती तेथे स्वस्ती पडते. या देशांतून साखर येते ती उसाची असते; युरोपांत बीटपासून साखर काढू लागले आहेत तीही इकडे येते, तरी या साखरेचा व्यापार फारसा वाढला नाही. युरोपांत