Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ हिंदुस्थानची साधनरूप इतिहास ३३ : : : महाराष्ट्राचा अधिपति पुलकेशी [चालुक्यकालीन लेखांपैकीं राजा पुलकेशी यांच्यासंबंधी माहिती देणारा एहोळी येथील शिलालेख महत्त्वाचा आहे. सत्याश्रय पुलकेशा हा हर्षाच्या समकालीन राजा होय. हा प्रस्तुतचा शिलालेख इ. स. ६३४ चा आहे. या लेखांत एकूण ३७ श्लोक आहेत. अनु टुप, इंद्रवज्रा, शार्दूलविक्रीडित, आर्या, मंदाक्रान्ता, वसंततिलका इ. अनेक वृत्तांमध्ये हे श्लोक रचलेले आहेत. यांतील निवडक श्लोकांचा अर्थ पुढे दिला आहे. केसांतील आंकडे श्लोकांचा क्रमांक दर्शवितात. मूळ लेख ‘एपिग्नाफिया इंडिका, व्हॉ. ६ ले. नं. १ चा आहे. कै. डॉ. श्री. व्यं केतकर यांनी या लेखाचे मराठी भाषांतर ‘प्राचीन महाराष्ट्र' या पुस्तकांत पृ. ४६० वर दिले आहे, त्याच्या आधारे पुढील उतारा दिला आहे. दुसरा उतारा युएन-त्संगाचा असून ‘भगवान् । बुद्धासाठीं'* या पुस्तकांतून पृ. १४३-५४ वरून तो घेतला आहे. ] (३) शूर आणि विद्वान् यांचेवर देगण्या व बहुमान एकसारखा अर्पण करणारा जो सत्याश्रय त्याचा सतत विजय असो ! (२०) कोंकण प्रांतांत त्याच्या आदेशांत वागणा-या सैन्यरूपी पर्वतप्राय लाटांनीं शत्रूच्या सैन्याच्या एकाद्या डबक्यांतील हलणा-या तरंगा प्रमाणे मौर्यसमृद्धीला खाली बसविलें. (२१) जेव्हां त्या अमितप्रभाने' पश्चिमसमुद्र- लक्ष्मी जी पुरी तीस वेढा दिला, त्या वेळी त्याची शेकडों जहाजे रांगेत उभे राहिलेल्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे दिसत होती. मेघांच्या पटलांनीं आकीर्ण झालेले आकाश नूतन कमलांनी युक्त अशा समुद्राप्रमाणे दिसत होते व समुद्र आकाशाप्रमाणे दिसत होता. , (२२) त्याचे प्रतापामुळे वश झालेले लाटा, मालव, गुर्जर वगैरे राजे शरण आलेल्यांनी कसे वागावे याचेच जणु काय आचार्य झाले. . | (२३) अपरिमित मोठेपणा आणि सामंतसेना यांचे मुगुटमाणि असलेल्या, शेकडो बलवान राजांच्या मुगुटांतील रत्नांनी ज्याचे चरणकमल व्यापले होते, आणि युद्धांत पडलेल्या गजेंद्राच्या सैन्यामुळे जो जुगुप्सा विषय झाला होता, अशा हर्षास त्याने विगलितहर्ष केलें.

  • उतारा ३१ ची प्रस्तावना पहा. १. अत्यंत तेजस्वी असलेल्या त्या (राजानें) | गुजराथचा पूवभाग २. जुगुप्सा-निर्भत्सना,दोष देणे.