पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/98

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुलकेशीचे औदार्थ (२४) जेव्हां तो आपल्या असंख्य सैनिकांसह राज्य करीत होता, त्या वेळी विघ्याच्या आसपासचा प्रदेश, जो रेवा नदीच्या विविध वाळूचे तटांनी सुशोभित होता, त्यास कांहीं न करतां विध्यसमीपता प्राप्त झाली. आपल्या तेजाच्या मोठेपणानें तो जास्त शोभला. (२५) ज्याने तिन्ही शक्त्या विधियुक्त काबीज केल्या आहेत, आणि त्यामुळे जो इंद्रतुल्य दिसत आहे, ज्याच्या उच्च घराण्यातील जन्मामुळे व इतर उत्कृष्ट गुणांमुळे आणि ज्याच्या इच्छाशक्तीने ९९ हजार खेड असलेल्या तिन्ही महाराष्ट्रांवर आपलें आधिपत्य मिळविलें, .(३१) त्याने चोल, केरळ, पांड्य, इत्यादि नृपतींस वैभवास आणले व पल्लव सैन्यरूपी धुक्यास आपल्या सहस्ररश्मिवत् सूर्याच्या किरणांनी घालवून दिले. (३५) तेव्हा हे भव्य, मोठेपणाचे आगर, जिनेंद्र मंदिर तिन्ही समुद्रापर्यंत राज्य करणा-या सत्याश्रयाचे अत्यंत मर्जीतील अशा हुशार रविकीतीन बांधले.


पुलकेशाचे औदार्य [ युएन-त्संगाने पुलकेशीचे केलेले वर्णन 'भगवान बुद्धासाठीं' या.. पुस्तकांत १५३-१५४ वर आहे, ते येथे दिलेले आहे. पुस्तकाचा अधिक परिचय पृ. ६० वर पहाः]..::. ।। ‘हा राजा उदारमतवादी -असून दूरदर्शी आहे. त्याच्या औदार्याचे व दातृवाचे क्षेत्र फार मोठे आहे. त्याची प्रजा राजनिष्ठ असून त्याची तत्परतेने सेवा करणारी आहे. ख-या योद्धयाला शोभेल अशीच त्याची अभिरुचि व रंसिकता असून तो युद्धांत जयाला सर्वात अधिक महत्त्व देतो. या कारणास्तव त्याच्या राज्यांतील पायदळ व घोडदळ अति दक्ष व सद सुसज्जित असते. लष्करी शिस्तीची कडक़ अंमलबजावणी केली जाते. लढाईच्या प्रारंभीं हे सैनिक, उन्मत्त.होईपर्यंत मद्यप्राशन करतात व मग त्यांच्यापैकीं हातांत भाला घेतलेला एकेक 'शिपाई. शत्रूच्या दहा हजारू ५ सा.इ. .,