पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/88

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शक राजा रुद्रदामन याने बांधलेला गिरनारचा सुदर्शन तलाव ५९ दामनची उज्जयिनी येथील शाखा इ. स. च्या चौथ्या शतकापर्यंत अस्तित्वांत हो राजांनीं याहि शाखेचा पराभव केला. प्रस्तुतच्या शिलालेखांत काठेवाडांत गिरनार पर्वतानजीकच्या सुदर्शन नामक तलावाची दुरुस्ती झाल्याची नोंद आहे. हा तलाव प्रारंभी मौर्य सम्राट चंद्रगुप्त याचा काठेवाड प्रांताचा सुभेदार वैश्य पुष्यगुप्त याने बांधला. पुढे अशोकाच्या कारकीर्दीत तुशास्प नांवाच्या यवन (पारशी ? ) सुभेदाराने त्यांतून कालवे काढून पाणी दूरवर पोहोचविण्याची व्यवस्था केली. कालांतराने हा तलाव नादुरुस्त झाला. त्याच्या दुरुस्तीचे काम रुद्रदामनच्या कारकीर्दीत, अमात्य सुविशाखा हा काठेवाडचा सुभेदार असता, त्याने पार पाडले. ही गोष्ट खालील शिलालेखांत सांगितली आहे. खेरीज रुद्रदामनने दक्षिणचा राजा ज्ञातकर्णी याचा पराभव केल्याचे वृत्तहि या शिलालेखांत नोंदलेले आढळते. हा शिलालेख संस्कृत भाषेत आहे. त्यांतील निवडक भागाचे भाषांतर पुढे दिले आहे. गिरिनार येथील हा सुदर्शन तलाव एका बाजूने पर्वताच्या कड्यासारखी तटाची बळकट बांधणी करून व दुस-या बाजूने निसर्गदत्त बंधा-याचा उपयोग करून तयार केला आहे. त्यास पाट काढलेला आहे व गाळ काढून टाकण्याची व्यवस्था केली आहे. हा आतां सुस्थितीत आहे. महाक्षत्रप रुद्रदामन यांच्या वयाच्या बहात्तराव्या वर्षी मार्गशीर्ष व. १स तो बांधून पुरा झाला.] पूर्वी महावृष्टि झाली व त्यामुळे ऊर्जयत पर्वताच्या पायथ्याशी वाहणारे पलाशिनी, सुवर्णसिकता इत्यादि प्रवाह एवढे तुडुंब वाहून चालले कों त्याने सर्व सृष्टि जणू काय सागरमय झाली. एरव्हीं बंधा-याचा बंदोबस्त पक्का होता. परंतु त्या वेळी एवढे वादळ झालें कीं, तलावांतील पाणी अगदीं घुसळून निघाले. त्या तुफानाचा जोर एवढा की त्याने चराचर सृष्टीच्या अखेरच्या प्रलयप्रसंगाची आठवण करून दिली. बंधारा फुटन वाहून जाणा-या पाण्याचा जोर एवढा की त्यांत झाडे, दगड, छोटे खरुज, मद्दाम उंच बांधलेली असल्याची ठिकाणे सर्व धडाधड कोसंळून प्रवाहांत वहात गेली. या निसर्गप्रकोपाने सुमारे ४७५ हात (एक हात = १८ इंच) लांब तितकेच रुंद व ७५ हात खोल एवढे मोठे भगदाड पडले व त्या भागांतील पाणी वाहून जाऊन तळाचा वालुकामय प्रदेश भेसूर स्वरूपांत उघडा पडला. ....