पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/87

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ५४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास मृत्युशय्येवरील राजस्त्री ( मागील चित्राचा खुलासा ) कोणी राजा आपल्या स्त्रीवर राज्य सोपवून बुद्ध भिक्षु झाला. त्याची राणी विरहाने खंगून खंगून मरण्याच्या पंथास लागली आहे. तिच्या थोरल्या मुलीने तिला सावरून धरली आहे. धाकटी मुलगी आपली आई आतां थोडया घटकांची सोबतीण आहे, अशा दुःखित चेह-याने तिजकडे पहात आहे. मरणसमयीं पतीचे दर्शन नाहीं तें नाहीं निदान त्याच्या राजमुकुटाचे तरी दर्शन घ्यावे या हेतूने दोन सेवकांकडून तो राजमुकुट आणविला आहे. पण त्याकडे पहावयास पापणी उघडण्याचे देखील तिला आतां सामर्थ्य राहिले नाहीं. कोणी दासी विझण्याने मंद असा वारा घालीत आहे. वर गच्चीवर वैद्यबुवा कांहीं औषधाचा घट घेऊन जात आहेत. त्यास कोणी कांहीं उपाय आहे का म्हणून विचारीत आहे. वैद्यही ‘फार तर दोन घटकांची सोबतीण' अशा अथांचा हात करीत आहे. --श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधीकृत ‘अजंठा' पृ. ५४ २९ :: : शक राजा रुद्रदामन याने बांधलेला गिरनारचा सुदर्शन तलाव [ राजन् महाक्षत्रप रुद्रदामन याचा जुनागड येथील शिलालेख. मध्य आशियातील शक किंवा सिथियन लोकांची जमात अनेक ठिकाणीं वसाहतो करीत व तेथून उच्चाटन होत, इसवी सनाच्या दुस-या शतकांत पश्चिम हिंदुस्थानांत येऊन थडकली. तिने सुराष्ट्र ऊर्फ गुजराथेत राज्य स्थापिले. त्यांच्यांतील रुद्रदामन नांवाच्या राजाने माळवा व वाजूचा प्रदेश या प्रांतावर अधिराज्य स्थापन केले. हे आपणास ‘सत्रप' किंवा 'क्षत्रप' म्हणवीत व स्वतःस त्या वेळीं इराणांत, राज्य करीत असलेल्या पाथियन राजांचे सुभेदार समजत असत. या क्षत्रपांच्या शाखांपैकीं सुराष्ट्राच्या दक्षिणेस, पश्चिम किना-यावर राज्य करणा-या शाखेचा शालिवाहनाने पराभव केला. परंतु रुद्र