. . शातवाहनासंबंधी लेख ।
४१
जावयाचे ते सोपा-याचे बंदर गांठण्याकरितां. हा प्राचीन कालचा व्यापारचा रस्ता होता. नाना घाट शातवाहनांच्या ताब्यात होता, एवढेच नव्हे तर, ती त्यांची महत्त्वाची जागा होती.
वरील माहिती ही डॉ. केतकर यांच्या विवेचनावरून सारांशाने दिली अ.हे. जिज्ञासून ‘प्राचीन महाराष्ट्र' पृ. ४०१ ते ४११ पहावी.
नाना घाटांतील एकूण लेख ९ अहेत. त्यांपैकी काही लेख पुढे दिले आहेत. या लेखांच्या बरोबर मूति होत्या त्या आज भग्न झालेल्या आहेत. लेखांचा मराठी अनुवाद डॉ. केतकरकृत आहे. ।।
(१) ॐ प्रजापतोला नमस्कार असो. नमस्कार धर्माला, इंद्राला, संकर्षण वासुदेव यांना आणि चंद्रसूर्याना. महिमावतांना. चारहि लोकपालांना (म्हणजे ) यम, वरुण, कुबेर, वासव यांना नमस्कार.
(५) नागश्रेष्ठाच्या (दयिनि = दयिता) स्त्रीचे, महिनाभर उपवास करणारीचें, गृहतापसीचे, ब्रह्मचर्याचे आचरण जिनें केलें अशीचे, दीक्षा, व्रत, यज्ञ यांत कुशल आहे तिचे, यज्ञांत धूप आणि सुगंध जिने हुत केले अहेत तिचे.
(९) (पुंड) रिक यज्ञ दक्षिणेसाठी दिल्या ११००० अश्व १००० असर्पक....
(१४) गाई २००००.•••भगल. दशरत्र यज्ञ जेथे दक्षिणा दिली गाई १०००१. गर्गातिरात्र यज्ञ जेथे दक्षिणा......प्रसर्पकांस दिलेली वस्त्रे ३०१.
गवामयन यज्ञ जेथे दक्षिणा दिली गाई ११०१. लेख ३ राजा सिमुक शातवाहन श्रीमान् याचा. लेख ४ देवी नायनिका राजा श्री शातकर्णी यात्री इचा. लेख ५ कुमार भाय... लेख ६ महारठि त्र्यणकयिर. लेख ७ कुमार कुसिरि लेख ८ कुमार सातवाहन
अभ्यास:--१. कोणत्या यज्ञांची नांवें या लेखांत आहेत ? दक्षिणा कोणत्या स्वरूपांत दिली आहे. २. कोणत्या राजासंबंधी हा लेख असावा असे अनुमान करतां येते ?
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/74
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
