पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४% हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास । महामात्र) पाठवीन की जो फार कठोर नसेल किंवा भीषण नसेल तर सौम्य असेल, तो हे पाहील की न्यायाचे अधिकारी मी जे शासन घालून दिले आहे त्यांप्रमाणे वागत आहेत की नाहींत. (र) तसेच उज्जयिनीहून त्याच हेतूसाठी दर कुमार त्याच प्रकारचा एक अधिकारी पाठवील, असा हेतु की निरीक्षणाशिवाय तीन वर्षे देखील जाऊं नयेत. (ल) त्याच्याप्रमाणे तक्षशिलेहूनदेखील एक अधिकारी पाठविला जाईल. (व) जेव्हां हे महामात्र दौ-यावर निघतील तेव्हां ते स्वतःचे कर्तव्य र दुर्लक्षितां, न्यायाधीश राजाज्ञेप्रमाणे काम करीत आहेत किंवा नाही हे पाहतील. अभ्यास :--राज्यव्यवस्थेसंबंधी कोणत्या सूचना या लेखांत आहेत ? महाभाची कामे कोणती ? त्यांनी लोकांना कसे वागवावे ? विशेष अभ्यास : हे तीन लेख वाच न अशे.कासंबंधी पुढील माहिती लिहा. १ पूजेसंबंधीं कर्तव्याची कल्पना. २ परकीय सत्तेशी वागण्याची रीत. ३ धर्माची जाणीव. ४ धर्मलिपि लिहिण्याची कारणें. ५ कलिंग विजय. ६ परमतसहिष्णुता. ७ अशोकाची योग्यता. २१ । । शाताहनासंबंधी लेख [ “नाना घाटांतील हे लेख अक्षरांच्या ठेवणीवरून ख्रि. पू. २०० ते २५०च्या सुमारास कोरले गेले असावेत असे बहुतेक संशोधवांचे मत आहे. .... या लेख च्या अर्थीकरणाकडे व्हावेत तसे परिश्रम अद्याप झालेले नाहींत. संशोधक साइक्स, डॉ. फ्रांके, स्टीव्हन्सन भगवानलाल इंद्रजी यांनी असे प्रयत्न केले तरीदेखील काही भागांचा अर्थ अजून लागत नाहीं. प्रस्तुत नाना घाटाचे लिखाण अनेक तन्हांनी अत्यंत महत्त्वाचे आहे. यांतील अनेक शब्द असे आहेत की ज्यांवर स्वतंत्र भाष्य करतां येईल. । नाना घाटाची जागा मोठी महत्त्वाची आहे. कारण आज कोंकणातून पुणे जिल्हयांत उतरावयास किंवा नाशिककडे जावयास हा घाट महत्त्वाचा आहे. मुरबाडहून नाना घाटांत जावयाचे आणि तेथून जुन्नरला जावयाचे, हा क्रम सध्यांहि चालू अ.हे. अजून जुन्नरच्या बाजारांत ठाणे जिल्ह्यांतला माल नाना घाटांतून येतो. या घाटांतून मुरबाडकडे