पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास उपनिषद्कालांतील वादविवाद | [-गुरूजवळ बसून समजलेली (उप + नि + सद = बसणे)ती उपनिषदे होत. वेद, त्यांचा अर्थ सांगण्याचे यत्न करणारे ब्राह्मण नांवाचे ग्रंथ, उपनिषदें व आरण्यके यांना ‘श्रुति' अशी संज्ञा आहे. वेदकालीं आद्यमानवांनीं सृष्टीतील पंचमहाभूतांची भक्तिभावाने प्रार्थना केली. उपनिषदकालांतील आर्य हे सृष्टिदेवतेवद्दलच्या आदर, आश्चर्य, भीति, इत्यादि प्राथमिक भावनांच्या पलीकडे जाऊन त्याबद्दल खोल विचार करू लागले; तेव्हां त्यांना या पंचमहाभूतांच्या बुडाशीं असलेल्या जगन्नियंत्याचे स्वरूप स्पष्टपणे कळून अलें. ह्या तत्त्वज्ञानाचे नितांत सुंदर विवेचन उपनिषदांत पाहावयास सांपडते. | मराठीमध्ये अलीकडच्या काळांत आचार्य भक्त कै. वि. वा. बापट यांनीं 'सुबोध उपनिषत् संग्रह' लिहून संस्कृतांतील ज्ञान मराठीत आणले आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेत बापटशास्त्री लिहितात-- ‘‘उपनिषदे हे सर्व तत्त्वज्ञानाचे मूळ आहे. द्वैताद्वैतादि सर्व वादांचे व सर्व पंथांचे मूळ आहे. सर्व आस्तिकनास्तिक दर्शनांची प्रवृत्ति यापासूनच झाली आहे. उपनिषदांनाच वेदान्त हे दुसरें प्रसिद्ध नांव आहे. आत्मा हा याचा विषय आहे.... उपनिषदांचा अभ्यास केल्यावाचून गीता-ब्रह्मसूत्रादि ग्रंथ बरोबर कळणे शक्य नाही. मी कोण, हे जगत् कसे झाले व याचा कर्ता कोण आहे, ही जिज्ञासा--ही तळभळ-उपनिषदांच्या अभ्यासानेच शांत होते......याच ग्रंथाच्या पृ. २३४ वर ते लिहितात. “बृहदारण्यकोपनिषदापैकीं तिस-या अध्यायांत वणलेला प्रसंग पुढे दिला आहे. हे उपनिषद्, फार मोठे असल्यामुळे बृहत् व अरण्यांत म्हणावयाचे असल्यामुळे 'आरण्यक होय. कर्म व उपासना यांचे फल असा जो संसार त्याविषयी विरक्त । झालेल्या अधिकारी पुरुषाला ब्रह्मविद्येचा उपदेश करावा हा याचा हेतु आहे." । प्रत्येक उपनिषदाचा मूळ संस्कृत श्लोक व त्याचा मराठी अर्थ दिल्यानंतर केवळ मराठी समजणारांना सुसंगत अर्थ कळावा म्हणून त्यांचे सविस्तर सिंहावलोकनहि ग्रंथांत शास्त्रीबुवांनी दिले आहे. त्यांतूनच पुढील मजकूर घेतला आहे. पृ. ७७७, ७८८, ७८९. ] विदेहाच्या वंशांत उत्पन्न झालेल्या जनकाने एकदां पुष्कळ दक्षिणा युक्त यज्ञ केला. त्या निमित्ताने कुरुपांचाल देशांतील मोठमोठे वेदवेत्ते एकत्र जमले होते. अनेक विद्वान् ब्राह्मणांचा तो मोठा समूह पाहून राजाल