पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपनिषङ्कालांतील वादविवाद ११ यामध्ये अतिश्रेष्ठ प्रवचनकर्ता, ब्रह्म जाणणारा कोण आहे हे जाणण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्याने आपल्या गोठ्यांतं एक सहस्र गायींचा संघ करविला. त्यांतील प्रत्येक गायींच्या एकेका शिंगाला सोन्याची ‘पाद' या नांवाची पांच पांच नाणी बांधली होती. अर्थात् प्रत्येक गायोंच्या दोन्ही शिांना मिळून सुवर्णाची दहा नाणीं बांधली. नंतर तो त्या ब्राह्मणांस म्हणाला, ** अहो पूज्य ब्राह्मणहो, तुम्हांमध्ये जो अतिशय ब्रह्मज्ञ असेल त्याने या गायींना आपल्या घरी न्यावे.' पण त्या ब्राह्मणांतील कोणीच त्यांना नेण्यास धजेना. तेव्हां याज्ञवल्क्याने शिष्यास त्या गायींना आपल्या घरी नेण्यास सांगितले. हे पाहून आम्ही एवढे मोठमोठे ब्रह्मज्ञ येथे असतांना हा स्वतःलाच ब्रह्मज्ञ कसा म्हणवीत आहे ?' अशा आशयाने इतर ब्राह्मण क्रुद्ध झाले. [-त्यांत जनकाचा होता--हवनकर्ता--अश्वल म्हणून होता, त्याने व त्यानंतर जारत्कार व आर्त भाग, उशस्त, चक्रनारायण, गार्गी यांनी याज्ञवल्क्याला प्रश्न विचारले. तसेच मद्रदेशांत कपिगोत्री पतंचलाच्या घरीं यज्ञशास्त्राचे अध्ययन करणा-या उद्दालक अरुणीने शंका विचारल्या. त्या सर्वांची समाधानकारक उत्तरे याज्ञवल्क्याने दिली. ] त्यानंतर वाचक्नवी गार्गी म्हणाली, " अहो पूज्य ब्राह्मणहो, मी काय म्हणते ते ऐका. माझ्या मनांत या ब्राह्मणाला पुन्हा दोन प्रश्न विचारावे असे आहे. तुम्ही जर अनुमोदन देत असाल तर मी विचारते. याने त्यांची उत्तरे जर दिली तर याला तुम्हांपैकी कोणीहि ब्रह्मसंबंधीं वादांत जिंकू शकणार नाहीं. तेव्हां ते ब्राह्मण म्हणाले, "विचार". ती म्हणाली “याज्ञवल्क्या, मी तुला दोन प्रश्न विचारते. जसा काशीराजा किंवा शूरपुत्र वैदेहिराजा आपले धनुष्य सज्ज करून दोन बाण घेऊन शत्रूच्या पुढे उभा राहतो त्याप्रमाणे मी हे दोन प्रश्न घेऊन तुझ्यापुढे आले आहे. मला त्यांची उत्तरे सांग.” तेव्हां “ विचार" असे याज्ञवल्क्य म्हणाले. गार्गी म्हणाली, * हे मुने द्युलोकावर, पृथ्वीच्या खालीं, मध्ये व त्रिकालीं सर्वत्र असणारे जें सुत्रसंज्ञक वायुतत्त्व ते कशामध्ये ओतप्रोत आहे ?' याज्ञवल्क्य म्हणाला, * गार्गी, ते व्यक्त जगदात्मक सूत्र अव्याकृतसंज्ञक अविद्याशवल नारायणाख्य अंतर्यामीमध्ये त्रिकाली ओतप्रोत आहे. हे ऐकून गार्गी म्हणते हे मुने, तुला नमस्कार असो. तू माझ्या या कठिण प्रश्नाचे उत्तर सहज दिले आहेस.” आतां आणखी एक प्रश्न विचारते त्याचे उत्तर दे. याज्ञवल्क्य म्हणतो,