पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/226

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवा ब्राह्मणाच्या राज्यांत दिल्ली सामावण्याची राजारामाची इच्छा १९७ घोरपडे व कृष्णराव घोरपडे हे राजारामाकडे येत आहेत. त्यांस इ. स. १६९१ त छत्रपति राजाराम महाराजांनी ही कामगिरी सांगितली आहे. हृणमंतरावास पांचलाख व कृणरावास एक लाख मिळून सहा लाखांचा सरंजाम कबूल केला आहे, पण तो पदरांत टाकण्यापूर्वी पायच्या सांगितल्या आहेत. औरंगजेबाला आसपास शह लावावा आणि औरंगाबाद व खुद्द दिल्लीकडे आवढाव करून तिकडून जेर करावा म्हणजे मराठ्यांच्या मुलुखावरील त्याची पकड ढिली होईल हाच या योजनेतील दूरचा पेंच आहे. सारांश, महाराष्ट्र राज्याची अभिवृद्धि करणारांच्या मनांतील गोष्ट ही कीं, विजापूर भागानगरच नव्हे तर औरंगाबाद दिल्लीसुद्धां देवाब्राह्मणांच्या राज्यांत आणावी. आतां कुणास या देवा ब्राह्मणांच्या राज्याच्या प्रसारास साम्राज्यवादाचा किंवा धर्माधिष्ठित राज्याचा वास येत असला तर तो ‘वास' वस्तुगत आहे की वास घेणाराचा तो दोष आहे हे संशोधनाने पारखून ठरवावे लागेल. एक गोष्ट मात्र निश्चित आहे कीं, पुढे घडलेल्या वनावावरून राजारामकालीन लोकांचे हेतु ठरविणे योग्य होणार नाहीं. ] ‘वजारतमाब राजेश्री हणमंत घोरपडे गोसावी अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री-प्रती राजाराम छत्रपती उपरी तुमचे विशई राजश्री नागोजी माने येही विनंती केली कीं तुमचा मुदा स्वामीच्या राज्यांत यावयाचा आहे, स्वामीने त्याजयोग्य भाग्य दिधलिया त्याप्रती राजश्री रामचंद्र पंडित अमात्य याजकडे येतील म्हणोन विदीत केले त्यावरून तुमचा मनोदेये कलला की महाराष्ट्रधर्म पूर्ण रक्षावां येसा (स) कलप (कल्प) स्वामीनी जानून तुम्हावरी (कृपाळ होऊन) राजश्री कृष्णाजी घोरपडे उभयतास भाग्ये होन पाा ६,००००० दिल्हे आहे बिाा राजश्री कृष्णाजी घोरपडे यास खाा तुम्हांस भाग्य होन ५० ० ० ० ० खाा तुम्हांस होन पाा। ६२५७ ० रायेगड प्रात कबज जालिया उपरी सरजाम ६२५०० विजापूर हस्तगत जाल्यानंतर द्यावे ६२५०० भागानगर घतल्यास । ६२५०० औरंगाबाद घेतल्यावर देणे २५०००० दिली घेतलेवरी | ५०० ० ० ० १३. सा.इ. [४१