पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास कलश रायँगडास जावयास संगमेस्वरास अले असतां सेक निजाम दौड करून येऊन उभयेतांस जीवतच धरून नेले वरकड लोक रायगडास गेले १.। फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कवि कलश यास जिवे मारून सिरछेद केले १. अभ्यासः-वरील ओळींतून फक्त त्रोटक नोंदी आहेत. त्या समकालीन व कत्यपुरुषांच्या घराण्यांतील आहेत म्हणून त्यांस महत्त्व आहे. या शकावलीतील शेवटचा उल्लेख शके १६१९ इ. स. १६९७ तील आहे. । २१ । देवा ब्राह्मणाच्या राज्यांत दिल्ली सामावण्याची राजारामाची इच्छा [ शिवचरित्र साहित्य खं. ५ पृ. १० ते १२ वर हे पत्र छापलें आहे. या पत्राच्या प्रारंभीं संशोधक श्री. शं. ना. जोशी यांनी पत्राच्या महत्त्वाचे वर्णन केले आहे. त्याच्या आधारे पुढील सारांश लिहिला आहे. "छ. राजारामाचा काल श. १६१० ते श.१६२१ (इ.स.१६८९-१७००) होय. ह्या राजवटीस 'स्वातंत्र्ययुद्धाचा काल' असे नांव दिले जाते. पण 'देवा ब्राह्मणांचे राज्य' किंवा 'महाराष्ट्र राज्य' अभिवृद्धीस लादण्यासाठी या काळीं मराठे लढत होते असे तत्कालीन शब्दांत याचे नेमकेपणाने वर्णन करता येईल. कारण शिवचरित्र साहित्य खंड ४ मध्ये जी तत्कलीन पत्रे आली आहेत त्यांतून याच संज्ञेचा उल्लेख आला आहे. (प. ७८ व ८० पहा.) राजारामकालीं अनेक मराठे, प्रभु, ब्राह्मण इ. मोगलाची बाजू सोडून इकडे आले. ह्याला उद्देशून ' गनिमाचे लष्कर आटोन हुजूर जमाव होऊ लागला.' असे स्वतः राजारामाने म्हटले आहे. फलटणकर मुधोजी निंबाळकर हे राजारामास लिहितात ‘आपण ताम्राकडे मनसबा करीत होतो ते टाकून या राज्यांत आलो कार्य निमित्य की हे महाराष्ट्र राज्यवृद्धीस पाववावे व आपले वतन आपले सांभाळी व्हावे म्हणोन सर्वश्वास तन्हा दिल्ही.' या महाराष्ट्र राज्याच्या मर्यादेत काय काय यावे असे राजाराम छत्रपति व त्यांचे सर-कारकून यांना वाटत होते ते पुढील पत्रावरून समजून येते. छ. राजारामाचे मनांत दिल्ली घेण्याची गोष्ट होती हे सांगणारे प्रस्तुत पत्र आहे. मुसलमानाकडे असलेले दोन सरदार, हणमंतराव ४० ]