Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीचे फौजेच्या अधिका-यास पत्र १८३ १५ । । : शिवाजीचे फौजेच्या अधिका-यास पत्र राजवाडे खं० ८, । वैशाख शु० १५ श० १५९६ ले० २८, पृ० २३ , १ ता. ९ मे १६७४ | [ आपल्या सैन्यापासून प्रजेस त्रास होऊ नये याबद्दल शिवाजी फारच जपत असे, हें निराळे सांगण्याची जरूरी नाहीं. एकदां शिवाजीच्या कांहीं फौजेची छावणी कोंकणांत होती. त्या फौजेच्या अधिकान्यास शिवाजीने एक पत्र लिहिले, ते पुढीलप्रमाणे ] श्रीभवानीशंकर । मशरुल अनाम राजश्री जुमलेदारानी' व हवालदारानी व कारकुनानी दिमत पायगो' मुक्काम मौजे हलवर्ण ता" चिपळूण मामले ६ दाभोळ प्रति राजेश्री शिवाजी राजे साा" अब सबैन व अलफ. कसबे चिपळूणीं साहेबी लष्कराची विले' केली आणि या उपरी घाटावरी कटक जावें ऐसा मान १० नाही म्हणून एव्हां छावणीस रवाना केलें. ऐसीयास, चिपळूणी कटकाचा मुक्काम होता याकरितां दाभोळच्या सुबेयांत १ पावसाळ्याकारणें पागेस सामा१२ व दाणा व वरकड १३ केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला व चिपळणाआसपास विलायतींत १४ लष्कराची तसवीस १५ व गवताची व वरकडे हरएक बाब लागली. त्याकरितां हाल १ ६ कांहीं उरला नाहीं. ऐसे असतां वैशाखाचे दिवस, उन्हाळा, हेही पागेस अधिक बैठी १७ पडली. परंतु जरूर जालें त्याकरितां कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देवऊनच जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास माने ऐसा दाणा, १ लौकिक, २ लोक, अर्थात् मशरूल अनाम-लोकांत लौकिकवान, * राजमान्य राजश्री प्रमाणे फारसी मायना. ३ जुमलेदार, हवालदार व कारकून यांचीं प्रथमेचीं अनेकवचनें, जुमलेदार जुम्ल्यावरील अधिकारी; जुम्ला–समाइकी जमीन. ४ दिमत-संबंधीं, पागेकडील. ४ पायगो-पायगापागा. ५ तरफ. ६ मामलत.७ साा-सुहुरसन. ८ 'अ'–४ सबैन७०, अलफ-१,०००; ९ व्यवस्था. १० हुकूम (?) ११ सुभ्यांत. १२ सामान, सामग्री. १३ इतर जिनसा. १४ विलायत-प्रदेश. १५ त्रास उपसर्ग. १६ आतां. १७ मुक्काम. [ २७