पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१३ राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा ३९ । । । राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा | [१, नोव्हेंबर १८५८.-कोथ भाग १, पृ. ३८२.] आजपर्यंत विश्वस्त म्हणून आमचे वतीने सन्मान्य ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानांतील प्रदेशाचा जो राज्यकारभार चालविला तो, पार्लमेंट सभागृहांत जमा झालेल्या सरदार, धर्मगुरु व सन्मान्य नागरिक यांचे मतानुसार व मान्यतेनुसार नानाविध महत्त्वाच्या कारणांसाठी आमच्या हाती घेण्याचे आम्हीं निश्चित ठरविले आहे. आम्ही असे जाहीर करतों कीं, सन्मान्य ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारान्वयें व आधिपत्याखाली एतद्देशीय संस्थानिकांशी जोडलेले राजनैतिक संबंध व केलेले करारमदार आम्हीं मान्य केले आहेत व ते आमचेकडून काळजीपूर्वक राखले जातील; व त्यांच्याकडूनहि ते तसेच टिकविले जातील अशी आमची अपेक्षा आहे. सध्या आमच्या अमलाखाली असलेल्या प्रदेशाची वाढ करण्याची अमची इच्छा नाहीं; आणि जसे आमच्या वसाहतींवर व हक्कांवर आक्रमण झाल्यास त्याची क्षमा केली जाणार नाहीं तसे दुस-यांच्या वसाहती व हवक यांजवर आम्ही अतिक्रमण करणार नाही. आमच्याप्रमाणेच एतद्देशीय संस्थानिकांचे हक्क, त्यांचा दर्जा व मानमान्यता यांचा आम्ही आदर करू; आणि अंतर्गत शांतता व सुव्यवस्था यांमुळे फक्त साध्य होणारा सामाजिक विश्वास व उत्कर्ष ते व आमचे प्रजाजन या दोघांनाहि व्हावा अशी आमची मनीषा आहे. ज्या कर्तव्यबंधनांनी आम्ही आमच्या इतर प्रजाजनांशी बांधलेले आहोत त्याच बंधनांनी हिंदुस्थानांतील रहिवाशांशीहि आम्ही निगडित आहों, आणि ईश्वराच्या आशीर्वादाने आम्ही ती बंधने विश्वासपूर्वक व न्यायबुद्धीने टिकवू. ख्रिश्चन धर्माच्या सत्यतेवर आमचा संपूर्ण भरंवसा आहे. त्या धर्मामुळे आम्हांस मनःशांति मिळते हे कृतज्ञतापूर्वक मान्य करतो. परंतु आमची हीं मनें बदमच्या प्रजाजनांपैकी कोणावरहि लादण्याची आमची मुळीच इच्छा नाहीं.