पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३४०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास दार, शिपाईआश्रित यासुद्धां आपण चितौन येथे भेट घेण्यास पत्रद्वार विनंति केली, तो मजकूर विदित झाला. आपल्या महनीय औदार्याबद्दल आजवर आम्ही कणपकर्णी ऐकतच होतों तें समक्ष प्रत्ययाला येऊन फार आनंद वाटला. सर्व बाबतींत इंग्रजांशी आपला हितविरोध असत त्यानाह आपण मदत केली ! हें पाहून असें मनांत आलें कीं, आजवर अनेक उदारी राजे यापूर्वी हिंदुस्थानांत झाले व आजह्नि आहेत, पण त्यांना आपली तुलना नाहीं . यावरूनच भरंवसा वाटतो कीं, येथील सर्व परिवारांसह आम्हा चित्तौनला आणल्या भेटीस निघून आलों तर आपण आपला उदार आश्रय आम्हांस नाकारणार नाही ! आतां जगांत आम्हांस आपणांशिवाय दुसरा आधार नाहीं ! इंग्रज सरकारने आजवर इतके तहनामे मोडले आणि इतक्या बचनांना हरताळ फासला आहे की, त्याचा येथे पुनःचार करण्पाचे कारण नाही. आणि त्यांनी अखेर लोकांचा धर्महि बुडविण्याचा प्रय केला म्हणून तर विद्रोह उत्पन्न झाला ! निघण्यापूर्वी अमचे येथून बंधु श्रीमंत महाराज गंगाधरराव ऊर्फ बाळासाहेब पेशवे यांनी स्नेहभावाचे पत्र पाठविलेंच आहे. तरी आपल्या इच्छेप्रमाणं ते आपली भेट घेऊन आप णांशों योग्य ती चर्चा करतीलच. " ३८ 'मी बंडखोर नाहीं शमीपूजन पृ. १०४ ७ मे । १८५९ [इंग्रज सेनापति होप फुटला पाठविलेल्या पत्रांत नानासाहेब पुणे व सातारा ही जहागीर परत मिळाल्याशिवाय आम्हीं शस्त्र लिहितो.] खल ठेवणार नाही. हिंदुस्थानचे राज्य गिटंकृत करून उलट मलाच बंडखोर (outlaw) ठरविण्याचा इंग्रजांना काय अधिकार पोहोंचल ? अभ्यास :--या सर्व पत्रावरून या क्रांतिकारकांचे काय हेतु होते है सांगा ? नेताजींनी ' या प्रसंगाची आठवण आपल्या आझाद सैनिकांना " करून दिली ? ५८]