Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोविंदराव काळे यांचे नाना फडणीसास पत्र २४१ काय असेल ते असो. त्या गोष्टी यांस शिंदे-होळकर दोन बाजू होऊन प्राप्त जाल्या. हल्लीं श्रीमंतांचे पुण्यप्रतापेंकरून व राजश्री पाटीलबाबांचे बुद्धि व तरवारेच्या पराक्रमेकडून सर्व घरास आले. परंतु जालें कसे ? प्राप्त जालें तेणेकडून सुलभता वाटली. अगर मुसलमान कोणी असे, तरी मोठे मोठे तवारीखनामे' आले असते. यवनाच्या जातींत तिळाइतकी चांगली गोष्ट जाल्यास गगनावराबर करून शोभवावी; आमचे हिंदूंत गगनाइतकी जाली असतां उच्चार न करावा हे चाल आहे. असो. अलभ्य गोष्टी घडल्या. उग्याच दौलती पुसत घरास आल्या. यांचे संरक्षण करणे परम कठिण ! दोस्त दुष्मन फार. यवनांचे मनांत की काफरशाही जालीं हें बोलतात. लेकीन ज्यांनी हिंदुस्थानांत शिरें उचलली, त्यांचीं शिरे पाटीलवावांनी फोडिली. कोणच्याही मनांत हे वहाडले, ते शेवटास जाऊ नये. यास्तव, नाना स्वरूप व युक्तीकडून नाश करावे ऐसे आहेत. न लाभाच्या त्या गोष्टी लाभल्या. त्यांचा बंदोबस्त शककर्त्याप्रमाणे होऊन उपभोग घ्यावे हें पूढेच. आहे. कोठे पुण्याईत उणे पडेल आणि काय दृष्ट लागेल न कळे. झाल्या गोष्टी यांत केवळ मुलूख, राज्यप्राप्त, इतकेच नाहीं, तरी वेदशास्त्ररक्षण, धर्मसंस्थापन, गोब्राम्हणप्रतिपालन, सार्वभौमत्व हाती लागणे, कीत, यश यांचे नगारे वाजणे, इतक्या गोष्टी आहेत. हे किमया संभाळणे हक्क आपला व पाटीलवावांचा! यांत वेत्यास पडला कीं, दोस्त दुष्मन मवजूद. संशय दूर जाले, हे अति चांगलें ! अति चांगलें ! या उपरी हे जमाव व या फौजा लाहोरच्या मैदानांत असाव्या. त्यांचे मनसबे' दौडावे°, वेत्यास पडावे, तमाशे पहावे, असे जन जे आहेत ते उशापायथ्यास लागून आहेत. चैन नव्हते. आतां आपण लिहिल्यावरून स्वस्थ जालें. जितके लिहिले इतक्याचे उगेच मनन व्हावे. खरें कीं लटके हे समजावे. रवाना छ ११ जिल्काद हे विनंती. १ बखरी. २ लबाड लोकांची बादशाही (काफर हा शब्द मुसलमान है। मुसलमानेतरांस केव्हां केव्हां तुच्छतेने लावतात). ३ परंतु. ४ वाढले. ५ अदभुत कृति. ६ अधिकार. ७ व्यत्यय, अंतर. ८ मौजूद, भांडण्यास तयार. ९ मसलत, राजकारण. १० पराभूत पावावे. [ ८५