पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० १२-७-१७९२ | हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ४२ : गोविंदराव काळे यांचे नाना फडणीसास पन्न इतिहाससंग्रह, व० १ लें । अं० ३ रा, ऐतिहासिक टिपणे, भा० १ ला, टिपण १३ | [ गोविंदराव काळे हा सवाई माधवरावाचे पेशवाईत निजामाचे दरवारी पेशव्यांचा वकील होता. त्याला नाना, महादजी वगैरेचे पर स्परांतील संशय दूर झाल्याचे कळल्यावर पेशवाईच्या वाढत्या वैभवाचे त्याने पुढीलप्रमाणे अंतःकरणपूर्वक वर्णन केले आहे. पत्रांत लिहिल्या प्रमाणे या वैभवास लौकरच दष्ट लागावी असा योग होता ! हे पत्र। पेशवाईतील मराठी गद्य वाङमयाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.) ....ऐशियास पत्र पाहतांच रोमांच उभे राहून अति संतोष जाला. याचा विस्तार पत्रीं किती लिहूं ? सीमा असे. यावरून ग्रंथांचे ग्रंथ मनांत आले. त लिहिल्याने बहुचकपणा' दिसतो. दिसो, परंतु जे मनांत आले त्यांतून किचित् अमर्याद करून लिहितो. एव एक रक्कम मनांत आणून दीर्घ दा" तोलून पाहिल्यास खरे आहे असेच निघेल. ते काय ? तपशील : अटक नदीचे अलीकडे दक्षिण समुद्र पावेतों हिंदूचे स्थान--तुरकस्थान' नव्ह –हे आपली हद्द पांडवांपासोन विक्रमाजितपावेतों त्यांनी राखून उपभा केला. त्यामागे नादान राज्यकर्ते निघाले. यवनांचे प्राबल्य जालें. चकत्या" हस्तनापूरचे पद घेतले. शेवटीं आलमगिराचे कारकीर्दीस यज्ञोपवतात, साडे तीन रुपये जेजया बसून, ओलें अन्न विकावे, सर्वांनी घ्यावे, हें नौबत गुजरली. | त्या दिवसांत कैलासवासी शिवाजीमहाराज शककर्ते व धर्मरावत निघाले. त्यांनी किंचित् कोन्यांत' धर्मसंरक्षण केले. पुढे कैलासवासी नाना साहेब, भाऊसाहेब प्रचंड प्रतापसूर्य असे जाले की, असे कधीं झालें नाहीं. अमु ब्राह्मणांनीं राज्य केले असे शास्त्रीं पुराणीं वर्णन नाहीं. परशुराम अवतार | १ भौचकपणा. वाचाळता. २ मर्यादा सोडन. ३ गोष्ट. ४ मुसलमानांचा देश, यवनभूमि. ५ झगताईखानाच्या वंशजांनी, मोगलांनीं. ६ व ब्राह्मणास. ७ जिझिया. ८ द्वाही फिरली. ९ देशाच्या लहानशा कोप-यात ८४] मा पाल'५